आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरूण तलाव परिसरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण तलावावर अतिक्रमण केलेल्या क्षेत्रापैकी ४४ आर क्षेत्रावरील अतिक्रमण तत्काळ काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मंगळवारी काढले. अतिक्रमणधारकांमध्ये खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांचे कुटुंबीय, पुष्पा ईश्वरलाल जैन, शिरीष उत्तमचंद रासयोनी यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त आणि तहसीलदार संयुक्तरीत्या ही कारवाई करणार असून त्यासाठी दविसांची मुदत देण्यात आली आहे. या अतिक्रमणाबाबत ‘दवि्य मराठी’ने नोव्हेंबर २०१४ रोजी ‘धनदांडग्यांनी तोडले मेहरूणचे लचके’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी अतिक्रमण शोधण्यासाठी तलाव मोजणीचे आदेश दिले होते.
मेहरूण तलावाभोवती तब्बल ४० एकर क्षेत्रावर अतिक्रमण केले असल्याची माहिती समोर आल्यानंतर ‘दवि्य मराठी’ने तलाव वाचवण्यासाठी या विषयाकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, तलावावरील अतिक्रमण मान्य करत पालकमंत्र्यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये जिल्हा प्रशासनाला अतिक्रमण मोजण्याचे आदेश दिले होते. तब्बल महिने चाललेल्या मोजणी प्रक्रियेत तीन वेळा हेराफेरी करण्यात आली आहे. पालकमंत्री खडसे यांनी एप्रिल रोजी तलावावर तिन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असल्याचा अहवाल आपल्याला प्राप्त झाल्याचे विधानही केले होते. त्यानंतर मात्र जून महिन्यापर्यंतदेखील अंतिम अहवाल प्राप्त झाला नाही. आधीची वहविाट पद्धतीने केलेली मोजणी नाट्यमयरीत्या रद्द करून नव्याने मोजणी करण्यात आली होती. नव्या मोजणीनंतर पुन्हा पालकमंत्र्यांनी तलावावर ८.५ एकर अतिक्रमण असल्याचे जाहीर केले. ही बाब अंतिम अहवालामध्ये नमूद असताना प्रत्यक्षात ४४ आर क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मेहरूण तलाव परिसरात धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने नोव्हेंबर २०१४ मध्ये पोलखोल केली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दखल घेऊन अतिक्रमणधारकांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले होते. परंतु अहवाल आला नव्हता. याबाबतदेखील ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

क्षेत्र : १७ आर
मंदिर,मठसाठी ताराबाई गवळी यांच्या ताब्यातील जागा.
सर्व्हे क्रमांक : ३७१
क्षेत्र : १६ आर

अतिक्रमणधारक : शिरीषउत्तमचंद रायसोनी, शेखर ग्यानचंद रायसोनी, सुनील ग्यानचंद रायसोनी, उमेश शिरीष रायसोनी, पुष्पा ईश्वरलाल जैन, त्र्यंबक दगडू पाटील,
अतिक्रमणधारक : आशिषरमेश जैन, रिषभ रमेश जैन, मधू रमेश जैन.

सर्व्हे क्रमांक : ४१४
क्षेत्र : ११ आर

इतर क्षेत्रावर केलेल्या अतिक्रमणाचे काय ?
भूमिअभिलेखविभागाने दिलेला ८.५ एकर अतिक्रमणाचा अहवाल वस्तुनिष्ट नसल्याचे कारण पुढे करत जिल्हाधिकाऱ्यांनी परत पाठवला होता. भूमिअभिलेख विभागाने नव्याने सादर केलेल्या अहवालानुसार ४४ आर क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, इतर क्षेत्रावरील अतिक्रमणाचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोजणीचे आदेश
अतिक्रमणकाढण्यासंदर्भात मंगळवारीच आदेश काढले आहेत. दविसांत अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाईल. महापालिका आयुक्त आणि तहसीलदार ही कारवाई करतील. रुबलअग्रवाल, जिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...