आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेहता रुग्णालयाच्या दुरुस्तीचे आदेश; आयुक्तांकडून पालिका रुग्णालयांच्या स्थितीची पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा रुग्णालयाप्रमाणे महापालिका रुग्णालयांची दुरवस्था झाली असून येथेही दुर्घटना घडू शकते, याकडे ‘दिव्य मराठी’ ने लक्ष वेधले होते. याची दखल घेत आयुक्त संजय कापडणीस यांनी गुरुवारी शाहू रुग्णालयासह चेतनदास मेहता रुग्णालयाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

पालिकेच्या चेतनदास मेहता रुग्णालयाची इमारतही धोकादायक बनली आहे. दरवर्षी या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित होऊनही प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याकडे ह्यदिव्य मराठीह्णने लक्ष वेधले होते. यात सिंधी कॉलनीलगत पालिकेचे चेतनदास मेहता रुग्णालय व प्रसूतीगृहात जिन्याचे प्लास्टर पडलेले असून जिन्याला लावण्यात आलेल्या सिमेंट जाळ्याही मोडकळीस आल्याकडे, ड्रेनेजचे पाइप फुटलेले, आॅपरेशन थिएटर लगतच्या भिंतींना लावलेल्या रंगाचे आणि प्लास्टरचे पोपडे निघाले तसेच गच्ची कमकुवत झाल्याकडे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त प्रदीप जगताप, प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी, शहर अभियंता सी. जी. पाटील, एस. जे. बोरोले, एस. एस. पाटील, उदय पाटील या अधिकार्‍यांसह शाहू रुग्णालय व चेतनदास रुग्णालयास भेट देऊन त्यांनी पाहणी केली.

शाहू रुग्णालयात जनरेटर बसवणे, नवीन बेडशीट खरेदी करणे यासह टेली मेडिसिन केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या. चेतनदास मेहता रुग्णालयातील इमारतीच्या पडझडीची पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. दुरुस्तीचे काम होईपर्यंत रुग्णांना इतर जवळच्या पालिकेच्या इमारतीमध्ये हलवण्यासंदर्भात परिसरातील नगरसेवकांची मते जाणून घेण्याचा मुद्दा या वेळी उपस्थित झाला. पदाधिकार्‍यांशी चर्चा करून या मुद्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
विशेष निधीची तरतूद
पालिकेच्या रुग्णालयात दाखल रुग्णाला मानधन तत्त्वावर सेवा देण्यासाठी येणार्‍या डॉक्टरांना वेळोवेळी त्यांचे मानधन मिळावे, यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यासंदर्भात प्रशासन विचार करत आहे. महिला डॉक्टर असल्यास रात्री अपरात्री त्यांना बोलवायचे झाल्यास वाहनसेवा देता येईल का, या संदर्भातही चर्चा झाली.
फोटो - आयुक्त संजय कापडणीस यांनी चेतनदास मेहता रूग्णालय दुरूस्तीचे आदेश अधिकार्‍यांना दिले.