आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्यानेच तलावाला अतिक्रमणाचा विळखा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणासाठी पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून करावयाच्या कामांचा आराखडा तयार आहे. मात्र, निधी असतानाही पुढील प्रक्रिया होत नसल्याने परिसरातील रहिवाशांकडून तलाव परिसरात अतिक्रमण करणे सुरू झाले आहे. महापालिकेच्या पथकाकडून तलावाच्या सीमांकनाचे काम करताना हे प्रकार लक्षात आल्याने काही जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र नोटीस बजावूनही केलेली कुंपणे काढण्यात आली नसल्याची स्थिती आहे.

मेहरूण तलावाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. निधी मिळाल्याने अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मेहरूण तलावाच्या विकासाचा श्रीगणेशा होण्याची आशा पल्लवित झाली होती. मात्र, सहा महिने उलटूनही यासंदर्भात पुढे ठोस काही झालेले नसल्याने तलावाकाठी राहणार्‍यांनी घरासमोर तारकुंपण घालून ती जाग विक सित करण्यासाठी अतिक्रमण करून ठेवले आहे. तलावाच्या सीमांकनासाठी प्रकल्प अधिकारी अ. वा. जाधव, कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता गोपाल लुले, सतीश परदेशी यांचे पथक जाऊन आले. या पथकाच्या निदर्शनास आलेल्या अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, अद्यापही तेथील कुंपणाचे अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.
सहा जणांना बजावल्या नोटीस
मेहरूण तलावाकाठी अतिक्रमण 30 दिवसांत काढून घेण्यासंदर्भात नगररचना विभागातर्फे गो.ह.गायवले, यमुनाबाई चौधरी, डी.जे. सोनार, आनंद मल्हारा, पातोंडकर ज्वेलर्स अशा सहा जणांना नगररचना विभागाने नोटीस बजावली होती. नोटीस प्राप्त झाल्यावर आपण अतिक्रमण काढून घेण्यास तयार असल्याचे उत्तर यातील काही जणांनी दिले; मात्र अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
पहिल्या टप्प्यात नियोजित कामे
प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांतून पहिल्या टप्प्यात सेंट टेरेसा शाळेपासून ते र्शीकृष्ण लॉनपर्यंतचा 4.70 किलोमीटर परिसर विकसित करण्याचे नियोजन आहे. यात रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत), जॉगिंग ट्रॅक, तलावाच्या बाजूने लोखंडी कठडे ही कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.