आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश दस्तएेवजांद्वारे मेहरूणची मोजणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अतिक्रमणांमुळेक्षेत्र कमी झालेल्या मेहरूण तलावाची मंगळवारपासून माेजणी केली जाणार अाहे. यासाठी भूमीअभिलेख विभागाकडून ब्रिटिशकालीन दस्तएेवजांची मदत घेतली जाणार अाहे. तसेच महापालिकेचा नगररचना विभाग मदत करणार अाहे. माेजणीसाठी या क्षेत्राचे कम्पार्टमेंट टाेपाे शीट यांचा अाधार घेण्यात येणार अाहे.
मेहरूण तलावात भराव टाकून अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले हाेेते. त्याची दखल घेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तलावाचे क्षेत्र माेजण्याचे अादेश दिले हाेते. माेजणीसंदर्भात तांत्रिक माहिती अाणि तयारी पूर्ण झाल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास माेजणीला सुरुवात हाेईल.
पालिका, भूमी अभिलेख करणार संयुक्त मोजणी
तलावावरअलीकडच्या काळात माेठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले अाहे. पुरातन असल्यामुळे या तलावाचे मूळ क्षेत्र माेजण्यासाठी तलावाच्या क्षेत्राची ब्रिटिशकालीन दस्तएेवजांमध्ये असलेल्या नाेंदीची मदत घेतली जाणार अाहे. टाेपाे शीटमध्ये ब्रिटिशांनी भूखंडाचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी दुर्बिण दगडांच्या खुणा राेवल्या हाेत्या. या खुणांची माेजणीच्या कामात मदत घेतली जाणार अाहे. भूमी अभिलेख अाणि महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मंगळवारी सकाळी १० वाजता माेजणीला प्रारंभ हाेणार अाहे.
ब्रिटिशकालीन भूमीगत दुर्बिण दगड?
भारतातइंग्रजांचे अागमन हाेण्यापूर्वी जमिनींचे माेजमाप झालेले नव्हते. सुमारे १८९० ते १९१५ दरम्यान त्यांच्यातर्फे शेतजमिनींची माेजणी करुन सर्व्हे क्रमांक तसेच जमीन मालकांची नावे लावली गेली. ज्या जमिनीवर काेणाचीही मालकी नव्हती त्यांची सरकारी जमिनी म्हणून नाेंद झाली. जमिनींची माेजणी करताना त्यांनी प्रत्येक शेताच्या चर्तुसीमा निश्चित करून रेखाचित्र तयार केले. हे करताना प्रत्येक ठिकाणी जमिनीखाली १० ते १२ फुटांवर बाय इंच चाैरसाचे विशिष्ट दगड गाडून ठेवले. त्यांना दुर्बीण दगड म्हटले जाते. हद्दीचे वाद उद‌्भवल्यास त्या दगडांचा अाधार घेतला जाताे.