आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ-नाशिक दरम्यान मेमू रेल्वे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बोलावलेली मेमू गाडी भुसावळ-नाशिक अशी चालवली जाईल. या गाडीला रेल्वे सेफ्टी कमिशनर यांची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी दिली.

नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी भुसावळ ते नाशिक या मार्गावर विशेष मेमू गाडी (लोकल) चालवण्यासाठी भुसावळ येथील रेल्वे यार्डात मेमू गेल्या दोन महिन्यांपासून येऊन थांबली आहे. ही गाडी सुरू करण्यासाठी सीआरएस (चीफ सेफ्टी आयुक्त) यांची परवानगी नुकतीच भुसावळ विभागाला मिळाली आहे. भुसावळ रेल्वे यार्डात दाखल झालेली मेमू लोकल गाडी ही गाडी भुसावळ ते नांदगाव नाशिक अशी धावणार आहे. भुसावळ येथून नांदगाव येथे अर्धा तासाचा थांबा राहणार असून तेथून नाशिककडे जाणार आहे. भुसावळ विभागात प्रथमच लोकलसारखी गाडी धावणार आहे. १२ डब्यांची ही गाडी आहे.