आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Memorandum Of Understanding Beneficial For North Maharashtra University

सामंजस्य कराराचा उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : प्रा. महाजन यांच्याशी चर्चा करताना जर्मनीचे श्रोडर थॉमस.
जळगाव - युरोपखंडातील विद्यापीठांशी सामंजस्य कराराच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक अनुबंध निर्माण व्हावेत. त्या माध्यमातून युरोप सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या इरॅस्मस प्लस या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला सहभागी होता यावे यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए.एम.महाजन यांनी पोलंड, नेदरलॅण्ड आणि जर्मनी या देशांतील विद्यापीठे आणि संशोधन परिसंस्थांना गेल्या आठवड्यात भेटी दिल्या.

कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा. ए.एम.महाजन हे १४ ते २४ सप्टेंबर या कालावधीत परदेश दौऱ्यावर होते. पोलंड येथील व्रोक्लॉ विद्यापीठ, वारसॉ तंत्रज्ञान विद्यापीठ, नेदरलॅण्डचे अॅमस्टरडॅम विद्यापीठ, पोलंड, बर्लिन येथील हेलमोल्टज् झेन्ट्रम् संशोधन संस्था आणि आयएचपी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, फ्रँकफुर्ट जर्मनी या पाच ठिकाणी प्रा. महाजन यांनी भेटी देऊन उमविच्या वाटचालीची माहिती या विद्यापीठांमधील आंतरराष्ट्रीय कक्षाच्या संचालकांना दिली. उमविचे परदेशातील विद्यापीठांशी झालेले सामंजस्य करार, विद्यापीठातील संशोधन, विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प यांची माहिती त्यांनी दिली. डॉ. कुजंडझिक सेल्मा, प्रा. वोजदॅगी ल्युकासन,डॉ. ल्युडविकोस्का कमिला, प्रा. श्रोडर थॉमस्, डॉ.सेबास्टीयन फिच्टर या संचालकांसह प्रा. महाजन यांनी सविस्तर चर्चा करून सामंजस्य करार होण्याच्यादृष्टीने सकारात्मक चर्चा केली.

विद्यार्थ्यांचे आदान-प्रदान
प्रशासन सामाजिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, गणितशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, भौतिकविज्ञान, जैवतंत्रज्ञान अभियांत्रिकी या विषयांमध्ये सामंजस्य करार होण्याची शक्यता असून त्या अंतर्गत भविष्यात शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अदान-प्रदान, संशोधन, व्याख्यान असे कार्यक्रम राबवले जातील. व्रोक्ला तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे जून जुलै २०१६ असा दोन महिन्यांचा समर स्कूल कार्यक्रम घेतला जाणार आहे. या विद्यापीठाचे संचालक फेब्रुवारी २०१६ मध्ये उमविला भेट देणार असून या समर स्कूलचा फायदा उमविच्या विद्यार्थ्यांना होईल.