आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंग टाकताना गच्चीवरून पडल्याने सिंधी कॉलनीत व्यापाऱ्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रंग टाकताना गच्चीवरून तोल जाऊन खाली पडल्याने एका व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धूलिवंदनाच्या दिवशी सिंधी कॉलनीत घडली. श्यामलाल आहुजा असे या प्रौढ व्यक्तिचे नाव अाहे. आपल्या मुलींच्या शिक्षणाबद्दल कळकळ असलेल्या श्यामलाल यांच्या मुलीने मंगळवारी वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मोठ्या हिमतीने दहावीचा पेपर दिला. 
 
सिंधी काॅलनीत साेमवारी फुले मार्केटमधील नवशक्ती गारमेंट्सचे मालक श्यामलाल परमानंद अाहुजा (वय ४२, रा. अम्मा बिल्डिंग समाेर, सिंधी काॅलनी) हे सुद्धा कुटुंबीय परिसरातील नागरिकांसाेबत धुळवड साजरी करीत हाेते. दुपारी १.३० वाजता ते रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या अंगावर रंग फेकत हाेते. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही मुली अाहुजा यांच्या घरच्या तळ मजल्यावरील दरवाजाजवळ लपल्या. त्यांच्या अंगावर रंग फेकण्यासाठी श्यामलाल अाहुजा खाली वाकले. त्या वेळी त्यांचा ताेल जाऊन ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. 

अाहुजा यांना अशाेक मंधान, टिकमदास तेजवाणी, महेंद्र कुकरेजा यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांची तपासणी केल्यानंतर अापत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. मुलांना चांगले शिकवण्याची श्यामलाल यांची हाेती इच्छा 
 
श्यामलाल अाहुजा यांना निकीता (वय १४), अंकिता (वय ११) या दाेन मुली अाणि अाशिष (वय १८) मुलगा अाहे. निकिता हिची सध्या दहावीची, तर अाशिष याची १२वीची परीक्षा सुरू अाहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यांचे अवसानच गळाले. मात्र, श्यामलाल यांची मुलांना चांगले शिकवण्याची इच्छा हाेती. त्यामुळे निकिता हिने वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना अादरांजली म्हणून मन खंबीर करून मंगळवारी पेपर देण्याचा निर्णय घेतला. श्यामलाल यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातच होता. मंगळवारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर सकाळी जिल्हा रुग्णालयात वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन निकिताने परीक्षा दिली. दुपारी १२ वाजता नातेवाइकांनी श्यामलाल यांचा मृतदेह ताब्यात घेतला. 
 
बातम्या आणखी आहेत...