आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात थंडीची लाट; आठ दिवसांत आठ अंशांनी घसरला पारा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहराचा पारा आठ दिवसात 8 अंशांनी खाली गेल्याने थंडीत वाढ झाली आहे. गेल्या रविवारी 19 अंशांवर असलेला पारा रविवारी 11 अंशांपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे संध्याकाळपासूनच बोचर्‍या थंडीत वाढ झाली आहे. सध्या हवामान कोरडेच राहणार असल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागावर कमी दाबाचे रूपांतर सध्या अधिक दाबाच्या क्षेत्रात झाले असून त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. तसेच समुद्र सपाटीवर लक्ष्यद्वीपपासून ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तरेकडील वारेही वेगाने वाहत असल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. थंडीत वाढ झाल्याने शहरात सायंकाळी लवकरच शांतता होऊ लागली असून गरम कपड्यांचा वापर वाढला आहे.
असे घसरले तापमान
1 डिसेंबर 19.0
2 डिसेंबर 17.4
3 डिसेंबर 17.8
4 डिसेंबर 17.5
5 डिसेंबर 19.0
6 डिसेंबर 15.3
7 डिसेंबर 12.2
8 डिसेंबर 11.0