आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अरे अाे सांभा, कितना जुर्माना रखे है सरकार गंदगी पर..!’, स्‍वच्‍छतेसाठी जळगावात रेल्‍वेने लढवली शक्‍कल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सध्या देशभर स्वच्छता अभियानाबाबत माेठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात अाहे. भुसावळसह जळगावच्या रेल्वेस्थानकावरही स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी चक्क ‘दीवार’ व ‘शाेले’ या चित्रपटांच्या पाेस्टर्सचा अाधार घेण्यात अालेला अाहे.  दाेन्ही चित्रपटांत गाजलेल्या डायलाॅगच्या मदतीने स्वच्छतेला प्राेत्साहन देण्याबराेबरच अस्वच्छता करणाऱ्यांना कायद्याची अाठवणही या पाेस्टर्सद्वारे करून दिली जात अाहे.  
 
मध्य रेल्वेने जळगाव रेल्वेस्थानकावर फलाट तीन व चारवर माेठ्या दादऱ्यावरून उतरताना प्रवासी शेडच्या खांब्यावर ‘शाेले’ चित्रपटाचे पाेस्टर्स लावले अाहेत. त्यावर ‘अरे अाे सांभा, कितना जुर्माना रखे है सरकारने रेल परिसर में गंदगी फैलाने पर? ५०० रुपये... पूरे ५०० रुपये’ असा डायलाॅग अाहे. ताे वाचल्यावर प्रवासी अापसूकच  हातातील रॅपर, कचरा फलाटावर न फेकता कचराकुंडीत टाकण्यासाठी पुढे सरसावत असल्याचा प्रत्यय येताे. भुसावळ रेल्वेस्थानकावरही केला सायडिंगकडून असलेला दादरा चढल्यावर दर्शनी भागात ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व शशी कपूरच्या ‘दीवार’ चित्रपटाचे पाेस्टर्स लावले अाहेत. त्यावर ‘मेरे पास रेलगाडी है, रिझर्व सीट है; तुम्हारे पास क्या है?..  मेरे मुँह में पान है, खबरदार! दीवार पर मत थूकना, नहीं ताे ५०० रुपये जुर्माना लगेगा’ हा संवाद लिहिलेला अाहे.  

सरकारी सूचना निष्प्रभ, पाेस्टर्स प्रभावी  
भारतीय गुणवत्ता परिषदेने ४०७ रेल्वेस्थानकांचे सर्वेक्षण केले हाेते. त्यात ‘ए’ श्रेणीत भुसावळ स्थानक २४, तर जळगाव ११५व्या क्रमांकावर अाहे. भविष्यात गुणांकनात ही स्थानके अव्वल ठरावीत म्हणून मध्य रेल्वेने जनमानसात अढळ स्थान मिळवलेल्या चित्रपटांच्या पाेस्टर्सचा वापर केला अाहे. ‘यहाँ थूकना मना है’, ‘भिंतीवर थुंकू नये’, ‘येथे कचरा टाकू नये’ अशा सूचना लिहूनही त्याचा उपयाेग हाेत नाही म्हणून रेल्वेने ही पाेस्टर्सची शक्कल लढवली अाहे.  
 
गब्बरच्या डायलाॅगने कायद्याचा धाक  
‘शाेले’ चित्रपट सन १९७५मध्ये प्रदर्शित झाला. त्यात गब्बरची भूमिका साकारलेले अमजद खान यांचा ‘अरे अाे सांभा, कितना इनाम रखे है सरकार हम पर?’ हा डायलाॅग प्रचंड गाजला. अाजही रसिकांना ताे ताेंडपाठ अाहे. चित्रपटांचे हेच गारूड लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून स्थानकांवर याच डायलाॅगच्या मदतीने स्थानकावर घाण केली तर किती दंड हाेऊ शकताे, हे प्रवाशांपर्यंत पाेहाेचवण्याचा प्रयत्न हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...