आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमफुक्टो’ निर्णयावर ठाम; संप सुरूच राहणार, प्राध्यापकांच्या मागण्या अजूनही मान्य नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासन मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे प्राध्यापकांचे बहिष्कार आंदोलन सुरूच राहणार आहे, असा निर्णय एमफुक्टोच्या बैठकीत रविवारी जाहीर करण्यात आला. शहरातील समाजकार्य महाविद्यालयात संघटनेच्या राज्यभरातील निवडक प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभर बैठक चालली. प्राध्यापकांचे आंदोलन न्याय्य मागण्यांसाठी आहे. मात्र, सर्वत्र प्राध्यापकांवरच तोंडसुख घेतले जात आहे. आंदोलन म्हटलं की कोणत्यान कोणत्या कायद्याचे उल्लंघन होणारच, मात्र आम्ही मागे हटणार नाही, असा निर्णय सर्वांनी घेतला.

शासनाकडून टीव्ही चॅनलवर दररोज घोषणा केल्या जात आहेत. मात्र लेखी स्वरुपात काहीही दिले जात नाही. चर्चा करण्यासाठी शासनाकडे वेळ नाही. चर्चेसाठी बोलावतात आणि सभागृहात झालेले निर्णय वाचुन दाखविले जातात. त्यामुळे ती चर्चा नसतेच, असा आरोप बैठकीत करण्यात आला.