जळगाव - राज्य शासनातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुरुवारी ‘एमएचसीईटी’२०१५ची सामाईक प्रवेश परीक्षा हाेत आहे. परीक्षेला चार हजार ६१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून जळगाव शहरातील १३ केंद्रांवर सकाळी १० ते वाजेदरम्यान ही परीक्षा हाेणार आहे. त्यासाठी विविध केंद्रांवरील बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात गैरप्रकार करणार्यांना आळा बसण्यासाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या परीक्षेसाठी १३ केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात १३ उपकेंद्र मदतनीस, ५३ पर्यवेक्षक, २१२ समवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६० पाणीवाले शिपाई, १९ वाहनचालक असे एकूण ६८६ अधिकारी कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
सकाळी १० ते 1 वाजेदरम्यान परीक्षा
मू.जे.महाविद्यालय न्यू काॅमर्स बिल्डिंग तळमजला - २४००००१ ते २४००२६४, मू.जे. महाविद्यालय न्यू काॅमर्स बिल्डिंग पहिला मजला - २४००२६५ ते २४००६२४, मू.जे. महाविद्यालय न्यू काॅमर्स बिल्डिंग दुसरा मजला - २४००६२५ ते २४०१०३२, एटी झांबरे विद्यालय (मू.जे.जवळ) २४०१०३३ ते २४०१३९२, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (जिल्हा उद्याेग केंद्रासमाेर) - २४०१३९३ ते २४०१७७६, आयएमआर (जिल्हा उद्याेग केंद्रामागे)- २४०१७७७ ते २४०२२३२, केसीई इंजिनिअरिंग काॅलेज (जिल्हा उद्याेग केंद्राजवळ)- २४०२२३३ ते २४०२७१२, एसएमआयटी काॅलेज बांभाेरी दुसरा मजला - २४०२७१३ ते २४०२९७६, एसएमआयटी काॅलेज बांभाेरी तिसरा मजला - २४०२९७७ ते २४०३४३२, अॅड.बबन बाहेती महाविद्यालय - २४०३४३३ ते २४०३९१२, आर.आर.विद्यालय- २४०३९१३ ते २४०४२४८, प.न.लुंकड कन्या शाळा- २४०४२४९ ते २४०४४३६ आणि यू २४३०००१ ते २४३०१००, भाऊसाहेब राऊत हायस्कूल (बी.जे.मार्केटसमाेर)- यू २४३०१०१ आणि एम २४४०००१ ते एम २४४००७५.