आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबराव मास्टर माइंड! म्हसावद शिक्षण संस्था घोटाळाप्रकरण- अर्जदारातर्फे जोरदार युक्तिवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- म्हसावद शिक्षण संस्थेच्या प्रकरणात आमदार गुलाबराव पाटील यांना अटक झाली आहे. ती संस्था त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून हडप केली आहे. ते आमदार आहेत, त्यांना कायद्याची जाण आहे. ते कायदा तयार करणाऱ्या यंत्रणेत आहेत. असे असतानाही त्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केली आहे. त्यामुळे ‘गुलाबराव यांना मास्टर माइंड म्हटले तरी चालेल’ अशा शब्दात अॅड.पी.एन.पाटील यांनी आमदार पाटील यांच्या जामिनावर तीव्र हरकत घेतली.
अॅड. पी.एन. पाटील यांनी त्रयस्थ अर्जदार यशवंत पवार यांच्यातर्फे शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद जाेरदार केला. पहिल्या मिनिटापासूनच अॅड. पाटील यांनी अनेक कागदपत्रांचा आधार घेत युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, या संस्थेतील काही सभासद बनावट आहेत. महारू बेलदार या सभासदाचा मृत्यू १८ ऑगस्ट १९९६ रोजी झाला आहे. तरीसुद्धा सन २००८मध्ये झालेल्या एका मीटिंगमध्ये त्यांची स्वाक्षरी आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनी बनावट कागदपत्रे दाखल करून संस्था हडप केली आहे. त्यांचा पोलिस प्रशासनावर दबाव आहे, त्यामुळे या प्रकरणात सुरुवातीला गुन्हाच दाखल झाला नाही. झालाच तर दोषाराेप सादर झाले नाही. दोषारोप सादर व्हावे, यासाठी फिर्यादीला खंडपीठात जावे लागले, तेथून आदेश झाल्यावर दोषारोप सादर झाले आहे. जबाब घेण्यासाठी पोलिसांनी दोन वेळा नोटीस देऊनही आमदार पाटील हजर झाले नाही. त्रयस्थ अर्जदार पवार यांनादेखील धमकी दिली आहे. त्यामुळे आमदार पाटील यांना जामिनावर सोडल्यास ते या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणू शकतील, असा युक्तिवाद अॅड.पाटील यांनी केला आहे. तर आमदार पाटील यांचे वकील पी.के.देशमुख यांनी जामीन मिळण्यासाठी युक्तिवाद केला. अॅड. देशमुख यांनी सांगितले की, ही संस्था २८ सप्टेंबर १९९१ रोजी स्थापन झाली. विद्यार्थीच भेटल्यामुळे पुढील काही वर्षे संस्था लयास गेली. त्यामुळे सन २००८मध्ये संस्थेतीलच काही सभासदांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन संस्था त्यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर सन २०१२पर्यंत एकही तक्रार झाली नाही. तत्पूर्वी फिर्यादींनी धर्मदाय आयुक्तांकडे चेंज रिपोर्टला हरकत घेतलेली नव्हती. ज्यावेळी या गुन्ह्यातील फिर्यादींना सचिवपदावरून हटवण्यात आले तेव्हा त्यांनी हरकत घेत सुडबुद्धीने गुन्हा दाखल केला. आमदार असल्यामुळे पाटील यांना कायद्याची जाण आहे. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही साक्षीदाराला किंवा सभासदाला धमकावले नाही. कायद्याचा मान राखून स्वत:हून पोलिसात हजर झाले आहे.
पोलिस कोठडीदरम्यान पोलिसांनी त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने घेतले आहेत. तसेच तपासाधिकाऱ्यांनी तपास केला असता, आमदार पाटील यांना अटी शर्तींवर जामीन देण्यास हरकत नाही, असा खुलासा तपासाधिकारी बागुल यांनी दिला आहे. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीमध्ये आमदार पाटील हे सहकार्य करणार असून त्यांना जामीन देण्यास हरकत नाही, असा युक्तिवाद अॅड. देशमुख यांनी केला. दरम्यान, शनिवारी जामिनावर निर्णय होणार आहे.

नियमडावलून न्यायालयात
कोणत्याहीगुन्ह्यात पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची कोठडीची मुदत संपल्याच्या दिवशी त्यांना दुपारी २.३० वाजता न्यायालयात हजर करावे लागते. मात्र, पोलिसांनी आमदार पाटील यांना सकाळी ११.३८ वाजताच न्यायालयात हजर केले. त्यानंतर सुनावणी होऊन न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यानंतर आमदार पाटील यांच्यातर्फे जामीन अर्ज सादर करण्यात आला. या अर्जावर दुपारी वाजता सुनावणी होणार होती. या मधल्या वेळेत पोलिसांनी आमदार पाटील यांना कारागृहात घेऊन जायला हवे होते. तसेच न्यायालयीन कामकाजाचे संकेत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना न्यायालयातच एका खोलीत बसवून ठेवले. तसेच दुपारी २.५५ वाजता सुनावणीला सुरुवात होईपर्यंत आमदार पाटील त्याच खोलीत बसले हाेते. तेथे अनेक कार्यकर्ते त्यांना तेथे भेटूनही गेले. यात आमदार किशोर पाटील, रावसाहेब पाटील, गजानन मालपुरे, माजी नगरसेवक श्याम कोगटा, अॅड. विजय पाटील, चंद्रकांत पाटील, नगरसेवक श्याम सोनवणे, चेतन शिरसाळे, पप्पू साेनवणे आदींचा समावेश होता. दरम्यान, आमदार असल्यामुळे दुपारी त्यांचे समर्थक न्यायालयात गर्दी करतील, म्हणून लवकर हजर केले असे कारण तपासाधिकारी बागुल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
आमदार पाटील यांची भेट घेऊन परताना चंद्रकांत पाटील संतोष चौधरी.

सोशल मीडियावर चर्चा
कायद्यालाश्रेष्ठ मानत पाटील यांनी अटक करवून घेतली. त्यांनी आईची पर्वा करता कायद्याला प्रथम स्थान दिले. आपल्या पदाचा वापर करून ते काही दिवस बाहेर राहू शकत होते. मात्र, त्यांनी तसे करता इतर नेत्यांपुढे ‘आदर्श’ निर्माण केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर सायंकाळपासून फिरत होत्या.

आमदार गुलाबराव पाटील यांना शुक्रवारी न्यायालयात आणले त्या वेळी जामीन मिळेल, अशी आशा असल्याने ते आनंदी दिसत होते. मात्र, न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर खिन्न चेहऱ्याने कोर्टातून बाहेर पडले.

आमदार पाटील यांच्या आईंची प्रकृती चिंताजनक असतानादेखील ते गुरुवारी न्यायालयाला शरण आले. एका दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर शुक्रवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर जामीन अर्ज दाखल करण्यात आला. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना न्यायालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आमदार पाटील यांना शुक्रवारीच जामीन मिळणार, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत होते. दुपारी वाजेपर्यंत सर्वांचेच चेहरे खुलले होते.
न्यायालयात आमदार पाटलांच्या जामिनावर युक्तिवाद झाले, मात्र निर्णय झाल्यामुळे पाटील यांना करागृहात जावे लागले. शनिवारी निर्णय होणार असल्याची माहिती न्यायालयातून बाहेर येताच कार्यकर्त्यांचे चेहरे पडले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सुनावणी आधीचा गुलाबरावांचा मुड दाखवणारा फोटो... आणि सुनावणी नंतरचे कार्यकर्त्यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...