आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीतील स्टील फर्निचर कंपनीत 95 हजारांच्या प्लेट चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एमआयडीसीतील समर स्टील या कंपनीत २७ डिसेंबर रोजी स्टील फर्निचरच्या प्लेट चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील चिंचोली शिवारात राजेंद्र सतीश ललवाणी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. स्टीलपासून फर्निचरचे सुटे भाग तयार करण्याचे काम कंपनीत केले जाते. २६ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री वाजता ललवाणी यांनी कंपनी बंद केली. त्यानंतर २७ रोजी सकाळी कंपनी उघडली असता काही साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. तसेच काही साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आले. सुरुवातीला त्यांनी शोधा-शोध केली. तीन-चार दिवस शोधकार्य केल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. चोरट्यांनी कंपनीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर सुमारे ९० किलो वजनाच्या स्टीलच्या प्लेट, फर्निचरचे सुटे भाग लंपास केले आहेत. 

दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 
या कंपनीत चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी तपासाला सुरुवात केली. कंपनीच्या आतमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली असता दोघे चोरटे आढळून आले आहेत. या चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधता कंपनीत शिरून चोरी केली असल्यामुळे पोलिसांच्या हाती चांगले पुरावे लागले आहेत. पण रात्रीच्या वेळी कंपनीतील दिवे बंद असल्यामुळे अंधारात दोघांची ओळख पटलेली नाही. या दोघांशिवाय आणखी काही चोरटे बाहेर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

एमआयडीसीतील चोरटे गायबच 
गेल्यावर्षी एमआयडीसी भागातील खत तयार करणाऱ्या कंपनीत चोरी झाली होती. या वेळी चोरट्यांनी चारचाकीने येऊन खताचा साठा लंपास केला होता. त्यानंतर शुक्रवारी उघडकीस आलेल्या चोरीचा प्रकारही तसाच आहे काय, या संदर्भात पोलिस तपास करीत आहेत. मागच्या गुन्ह्यातील चोरटे अद्याप मिळून आलेले नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...