जळगाव - एमआयडीसीमधील पंढरपूरनगरातील सुनील बाबुलाल विश्वे यांना मारहाण करून मोबाइल आणि पगाराचे दोन हजार रुपये लुटल्याची घटना रविवारी रात्री 11.15 वाजता एमआयडीसीच्या एम सेक्टर येथे घडली होती. विश्वे यांना लुटणार्या तीन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अमोल राजेंद्र सोनार, अतुल नथ्थू पाटील आणि वासुदेव सोपान टोंगळे (तिघे रा.अयोध्यानगर परिसरातील कौतिकनगर) अशी चोरट्यांची नावे आहेत.
तिघा आरोपीकडून पोलिसांनी चोरीस गेलेला मोबाइल, 1300 रुपये आणि एक हीरो
होंडा मोटारसायकल (एमएच- 19, बीएन- 080) हस्तगत केली आहे. उर्वरित पैसे तसेच त्यांचे कोणी आजून साथीदार आहेत का? याचा तपास घेणे बाकी आहे. बुधवारी तिघांना न्यायाधीश एस.बी.ठाकूर यांच्या न्यायालयात हजर केले असता तिघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. एम.एस.फुलपगारे तर आरोपींतर्फे अॅड. राशीद पिंजारी यांनी काम पाहिले.