आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्य दल, अभियांत्रिकीत नोकरीच्या संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सैन्यदलात वरिष्ठ पदे अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी मिळवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सैन्यातील विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या जागांवर नशीब अाजमावण्यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांनीही अभ्यासाला सुरुवात केली आहे.
सैन्य दलात नोकरीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ही संधी उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी येणाऱ्या महिनाभरात अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. युवकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. २०१५ या वर्षाच्या उत्तरार्धात या रिक्त जागांवर भरती होणार आहे. यात स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे ‘कनिष्ठ अभियंता’पदासाठी असलेल्या एक हजार जागांवर भरती होणार आहे. चालू वर्षाची ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे.
परीक्षा सहायक अभियंता
या पदासाठी एकूण १९० जागा आहेत. त्यासाठी इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी किमान ६० टक्के मिळवून उत्तीर्ण केलेली पाहिजे. याबाबत www.hpgcl.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.

‘कनिष्ठ अभियंता’साठी १०पर्यंत मुदत
स्टाफसिलेक्शन कमिशन (एसएससी)ने ‘कनिष्ठ अभियंता’ या पदासाठी एक हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. या पदासाठी डिसेंबर २०१५ रोजी परीक्षा होणार आहे. पदानुसार ९३०० ते ३४ हजार ८०० रुपये वेतन असणार आहे. याशिवाय ४२०० रुपयांचा विशेष भत्ता असणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी अभियांत्रिकीची पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

स्थानिक विद्यार्थी लागले तयारीला
डिसेंबरमध्ये होणाऱ्या ‘कनिष्ठ अभियंता’पदाच्या परीक्षेसाठी जळगावातील सुमारे हजार विद्यार्थी तयारीला लागले आहेत. शहरातील काही खासगी स्पर्धा परीक्षा केंद्रचालकांकडून त्यांच्यासाठी विशेेष मार्गदर्शन बॅच सुरू करण्यात आली असल्याचे एका खासगी शिकवणी चालकाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

न्यायाधीश, अॅडव्होकेट जनरल
यापदांसाठी एकूण १४ जागा रिक्त आहेत. त्यासाठी वर्षे इंटिग्रेटेड एलएलबी किंवा तीन वर्षे एलएलबी कोर्स किमान ५५ टक्क्यांनी पास होणे आवश्यक आहे. तसेच बार काैन्सिल ऑफ इंडिया संबंधित राज्य बार असोसिएशनमध्ये नोंदणीकृत वकील असणे सक्तीचे आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. याबाबत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...