आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Milk Federation Election: Candidates Return Back

दूध संघ निवडणूक:माघारीसाठी अाणलेल्या उमेदवाराने काढला पळ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत विराेधातील उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याला इच्छुक उमेदवाराने मंगळवारी उल्लू बनवले. माघारीसाठी जबरदस्ती त्याला गाडीत अाणल्याने त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने तेथून पलायन केले. त्यामुळे नेत्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या उमेदवाराचा जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी शाेध सुरू होता.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत अातापर्यंत भुसावळ अाणि एरंडाेल तालुक्यातील जागा बिनविराेध झाल्या अाहेत. बिनविराेध निवडून येण्यासाठी माघार घेणाऱ्यांना ठाेस अाश्वासन, बक्षीस, पॅकेज किंवा खुशाली देण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न हाेत अाहेत. या माेहिमेचा भाग म्हणून बिनविराेध निवडून येण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने देखील फिल्डिंग लावली अाहे. मंगळवारी या पदाधिकाऱ्याने विराेधातील एका उमेदवाराला हेरून थेट गाडीत बसवले. त्याने माघार घ्यावी म्हणून अाॅफर देखील दिली. परंतु उमेदवार तेवढ्यावर राजी झाल्याने त्याला गाेंजारत गाडीत बसवून अाणण्यात अाले. जबरदस्ती माघार घेण्यासाठी त्या इच्छुक उमेदवाराला घेऊन ताे पदाधिकारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पाेहचला. तेथे तहान लागल्याने पाणी पिऊन येताे, असे सांगून इच्छुक उमेदवाराने धूम ठाेकली. दुपारी शहरात विविध ठिकाणी शाेध घेऊनही उमेदवार सापडला नाही.

राजकीय वर्तुळात चर्चा
माघारीच्याशेवटच्या दिवसापर्यंत थांबा, असे ताे इच्छुक उमेदवार विनवणी करीत हाेता. परंतु एेनवेळी गडबड नकाे म्हणून अाताच काय ते उरकून टाकू, असा अाग्रह त्या राजकीय पदाधिकाऱ्याकडून केला जात हाेता. माघार घेण्यास नकार देणाऱ्या इच्छुक उमेदवाराने अखेर हाेकार भरून एेनवेळी पळ काढल्याने राजकीय क्षेत्रात एकच चर्चा हाेती.