आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला लावले वाममार्गाला, धुळ्यातील तीन महिलांना कारावास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अल्पवयीन मुलीला वाममार्गाला लावून तिच्यावर बलात्कार करणार्‍यास सहकार्य केल्याच्या आरोपाखाली धुळय़ातील तीन महिलांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या.आर.आर.कदम यांनी शिक्षा ठोठावलेल्या या महिलांची नावे स्वाती खैरनार, रेखा खैरनार आणि अलका उर्फ माया पिंपळे अशी आहेत.
वडजाई रोड परिसरातील चंद्रमणी चौकात राहणार्‍या अल्पवयीन मुलीने सन 2011मध्ये पोलिसांत तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीत तिची मैत्रीण स्वाती रमेश खैरनार हिने माझ्या मावशीकडे जायचे आहे, असे सांगून देवपुरातील जगन्नाथनगरात राहणार्‍या रेखा शिवदास खैरनारच्या घरी नेले. याशिवाय महावीर कॉलनीत राहणार्‍या अलका उर्फ माया रघुनाथ पिंपळे हिच्या घरीही नेले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय घडले