आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ३० ठिकाणी साकारतील सुसज्ज ‘मिनी मार्केट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात ३० ठिकाणी मिनी मार्केट उभारली जाणार आहेत. त्यातून बेरोजगारांना संधी मिळेल. त्याचबरोबर शहराचा चेहराही बदलेल, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. रस्त्याच्या कडेला बसून व्यापार करणाऱ्यांचा यात प्रथम विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील विकासाचा आराखडा मांडताना आमदार अनिल गोटे बोलत होते. त्यांनी सांगितले की, जेलरोडवरील अतिक्रमितांना जागा देण्याचा मुद्दा सुटला आहे. झुलेलाल व्यावसायिक व्यापाऱ्यांच्या संस्थेला लक्ष्मीबाई देव हाॅस्टेलची जागा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाटावरील अतिक्रमितांनी विश्वास ठेवला तर त्यांचेही योग्य पुनर्वसन केले जाईल. त्यांच्यासाठी निवासस्थानेही तयार आहेत. त्यांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश शासनाने यापूर्वीच दिले आहे. तर ज्यांचे अतिक्रमण काढले आहे. त्यांना पाटावर सात बाय सहा आकाराचा ओटा बांधून दिला जाईल. त्यातून त्यांचे पुनर्वसन केले जाईल. त्याचबरोबर शहरात अशाच ओट्यांची जवळपास ३० मिनी मार्केट बांधली जातील. त्यातून बेराेजगारांना संधी दिली जाईल. जिथे महापालिकेच्या जागा मोकळ्या आहेत त्या ठिकाणी ही मिनी मार्केट बांधली जातील. नवरंग जलकुंभाजवळ अशी जागा पाहिली आहे. विशेष बाब म्हणजे यात महापालिकेचा कोणताही संबंध राहणार नाही. सरकारच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ही कामे केली जाणार आहेत. यातून स्थानिक स्वराज्य संस्थेला कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून दिले जाईल. देव हॉस्टेलची उर्वरित जागा महापालिकेला दिली जाईल. त्यावर महापालिकेला व्यापारी संकुल बांधून उत्पन्न मिळवता येईल, असेही त्यांनी सांगितले.
सहामजली सुसज्ज माॅल
जेलरोडवरील व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या जागेवर सहामजली सुसज्ज व्यापारी माॅल उभारला जाईल. पारदर्शक कॅप्सूल लिफ्टसह तळमजल्यावर राष्ट्रीयीकृत बंॅक टेरेस, रेस्टाॅरंट, बॅडमिंटन, बिलियर्ड पूल, टेबल टेनिस या इनडोअर खेळांचे विभाग तसेच प्रत्येक मजल्यावर नाश्त्याची सोय, पार्किंगची व्यवस्था असेल. खरेदीसाठी येणाऱ्यांची कोणतीही अडचण होणार नाही.
शैक्षणिक संकुल
लक्ष्मीबाईदेव यांच्या स्मरणार्थ शासनाच्या नगाव परिसरातील शंभर एकर जागेवर राज्यातील माेठे शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर यशदाच्या धर्तीवर डायटच्या प्रकल्पासाठी १० एकर जागा दिली जाणार आहे. त्यासाठी दो कोटी ६० लाखांचे अनुदानही प्राप्त झाले आहे. या व्यतिरिक्त जागेवर वदि्यार्थिनींचे वसतिगृह, उमविचे उपकेंद्र, बँकेचे प्रशिक्षण केंद्र राहणार आहे.