आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Girish Mahajan Candidature From Jamner Socities

मंत्री गिरीश महाजनांची उमेदवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - तालुक्यात७३ सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. जिल्हा बँक निवडणुकीच्या धर्तीवर आठ विकास सोसायट्यांचे ठराव बदलण्यात आले आहेत. जिल्हा बँकेसाठी निवडणूक झाल्यास जामनेर सोसायटी मतदारसंघातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेच उमेदवार रहाणार असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिका-याने स्पष्ट केले.

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न होत आहेत. असे असले तरी अधून-मधून येणा-या विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिका-यांची वक्तव्य पहाता निवडणूक बिनविरोध होणे शक्य नाही. ऐनवेळी धावपळ नको, म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक पूर्वतयारी चालवली आहे. जिल्हा बँकेतील विकासो मतदारसंघासाठी जामनेर तालुक्यातील ९४ संस्थांचे ठराव आहेत. दरम्यान सन २०१३ मध्ये मुदत संपून मुदतवाढ मिळालेल्या ७२ संस्थांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विकासोतील सत्तांतरानंतर तोंडापूर, फत्तेपूर, वाकडी, टाकरखेडा, गोंडखेळ, चिंचखेडा तवा, नांद्रा प्रलो भराडी अशा आठ विकासोंचे पूर्वीचे ठराव रद्द करून नव्याने ठराव करण्यात आले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीसाठी एप्रिलपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वी पाच दिवस ठराव बदलता येऊ शकतात.

खासदार जैन रिंगणाबाहेर
केकतनिंभोराविकासोने देऊ केलेला ठराव कायदेशीर अडचणीत सापडल्याने सोसायटी मतदारसंघातून खासदार ईश्वरलाल जैन निवडणूक लढू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे सत्तांतरानंतर तोंडापूर विकासोने बदललेला ठराव पाहता विद्यमान संचालक डिगंबर पाटील हेही निवडणूक लढवू शकणार नाहीत, अशी चर्चा आहे.