पातोंडा (जळगाव)- चाळीसगाव-भडगाव रस्त्यावर पातोंडा गावाजवळ झाड पडल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. यामुळे 5 ते 6 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याच वाहतूकीत अडकलेले जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी स्वतः 2 तास थांबून ट्रॅफिक मोकळी केली. यावेळी चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय भास्करराव पाटील, सरपंच सचिन जाधव, पोपट तात्या भोळे, उपस्थित होते.