आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेनरिक अाैषधांची २५ हजार दुकाने उघडणार, केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महागड्या अाैषधांच्या किमती सर्वसामान्यांच्या अावाक्यात अाणण्यासाठी ६०० पेक्षा अधिक अाैषधांच्या किमती कंट्राेल प्राइस लिस्टमध्ये अाणल्या जाणार अाहेत. तसेच कमी किमतीची अाैषधी उपलब्ध हाेण्यासाठी देशभरात जेनरिक अाैषधांची २५ हजार स्टाेअर्स उघडली जातील, अशी माहिती केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरुवारी दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र माेदी लवकरच घाेषणा करणार असल्याचे ते म्हणाले.
भारत हा जगात सर्वात माेठा अाैषध निर्माता देश असून येथून २०० देशांना अाैषधांची निर्यात केली जाते. या उद्याेगाचा एकूण व्यवसाय २ लाख काेटींचा असून १ लाख १० हजार काेटींची अाैषधे निर्यात हाेतात. सर्वसामान्यांना कमी किमतीत जेनरिक अाैषधी मिळण्यासाठी २५ हजार जेनरिक अाैषधांचे स्टाेअर्स उघडले जाणार अाहेत. जनरिक अाैषधांचे स्टाेअर्स उघडण्यासाठी बेराेजगारांना अडीच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार अाहे. या स्टाेअर्समध्ये महागडी अाैषधे विक्री करण्यास बंदी असणार अाहेत. अाैषधांसह मेडिकल इन्स्ट्रुमेंटदेखील तेथे मिळतील. या अाैषधांच्या दर्जावर थेट शासनाचे लक्ष राहणार अाहे.
६०० अाैषधांच्या किमती नियंत्रणात
माेठ्या अाजारावरील ६०० प्रकारच्या महागड्या अाैषधांच्या किमती नियंत्रणात अाणण्यासाठी ही अाैषधे ‘नॅशनल फाॅर्मास्युटिकल प्राइस लिस्ट’अंतर्गत अाणण्यात येणार अाहे. अाैषधांसाेबत शस्त्रक्रियेसाठी लागणारी काही उपकरणे, वैद्यकीय उपयाेगाच्या महागड्या वस्तूंचे दरदेखील नियंत्रणात ठेवले जाणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...