आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री ताफ्यातील वाहनाचे ब्रेक फेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चोपडा साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी जिल्हा दौर्‍यावर आलेल्या गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेचा अचानक ब्रेक फेल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. ताफ्याने जळगाव ते धरणगाव हा 31 किलोमीटरचा प्रवास रुग्णवाहिकेशिवाय केला.

फर्दापूरजवळ जिल्हा हद्दीत शिष्टाचारानुसार सुरक्षेची जबाबदारी जळगाव पोलिसांनी घेतली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास ताफा प्रभात चौकाकडून अग्रवाल हॉस्पिटलजवळ पोहोचताच महामार्गावरील गतिरोधकांजवळ रुग्णवाहिकेच्या मागच्या चाकाच्या सिलिंडरमधून अचानक ऑइल गळती झाली. ब्रेक दाबण्याचा चालकाने प्रय} केला. मात्र, 15 ते 20 फुटापर्यंत ब्रेक लागले नाही. त्यामुळे पंप देऊन वाहन थांबवण्यात चालकाने यश मिळवले. ब्रेक फेल झालेली रुग्णवाहिका (एम.एच.19 एम 9181) न्हावी ग्रामीण रुग्णालयाची होती.

सिव्हिल प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड
प्रत्येक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौर्‍यात वैद्यकीयदृष्ट्या कोणतीही गरज भासल्यास ताबडतोब उपचार करण्यासाठी सर्व सोयींयुक्त अँम्बुलन्स तैनात ठेवली जाते. यात उपचारासाठी फिजिशीयन, सर्जन, भूलतज्ज्ञ, अस्तिरोगतज्ज्ञ, नर्स, रक्तपेढी तंत्रज्ञ, इसीजी तंत्रज्ञ, कक्षसेवक अशांची नियुक्ती करण्यात येते. परंतु गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील अँम्बुलन्समध्ये फिजीशीयन तसेच अस्तिरोगतज्ज्ञांचा समावेश नसल्याची माहिती उघड झाली. यावरून प्रशासन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बाबतीत किती संवेदनशील आहेत हे समोर आले.

अचानक ब्रेक फेल
गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या ताफ्यात सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिका दाखल होती. परंतु जळगाव शहरात अचानक ब्रेक फेल झाल्याने दुसरी रुग्णवाहिका मागवण्यात आली. यादरम्यान ताफा बराच लांब निघून गेला होता. परंतु आम्ही पुन्हा ताफ्यात दाखल झालो. -डॉ. नितीन विसपुते, पथकप्रमुख, जिल्हा रुग्णालय