आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचे प्रश्न साेडविण्याएेवजी मंत्री ट्विटर युद्धात रमले - दिलीप वळसे-पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यातील जनता विविध प्रश्नांनी त्रस्त असताना मात्र मुख्यमंत्री अन्य मंत्री हे ट्विटर युद्धात रमले आहेत. साेशल मीडियावर सुरू असलेले हे शाब्दिक युद्ध राज्याला परवडणारे अाहे काय? असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे जिल्हा निरीक्षक दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बुधवारी अायाेजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वळसे-पाटील बाेलत हाेते.

या वेळी जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी, माजी अामदार साहेबराव पाटील, राजीव देशमुख, दिलीप साेनवणे, अल्पसंख्याक अाघाडीचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला अध्यक्षा विजया पाटील, कल्पना पाटील, तिलाेत्तमा पाटील, मंगला पाटील आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीयकृत बँकांचे सहा लाख काेटींचे कर्ज थकले अाहे. विजय मल्ल्या कोट्यवधी रुपयांचा चुना लावून विदेशात पळून गेला अाहे. त्याचा बंदाेबस्त करायचे साेडून शासन शेतकऱ्यांच्या मागे लागले अाहे. त्यातच पीककर्ज पुनर्गठण करण्यास शासन दमडी देण्यास तयार नसल्याची टीका त्यांनी केली.

कामे करायची नसल्यास पदे साेडा
अनेक पदाधिकारी,सेलच्या अध्यक्षांनी केवळ पदे घेतली अाहेत. कामे करीत नसल्याने अशा पदाधिकाऱ्यांनी तत्काळ पदे साेडावी. निवडणुकीच्या संदर्भात परस्पर पक्षाचे निर्णय घेऊ नये. निर्णय पक्षपातळीवरच घेतला जाईल. तीन दिवसांत नगरपालिका निवडणुकीसंदर्भात तालुकापातळीवर निर्णय घ्यावा. अामदार डाॅ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

‘मेक इन इंडिया’मध्ये शेतकरी कुठेच नाही
माेदी शासनाच्या‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात शेतकरी काेठेही नाही. या वर्षी पीक विम्याची संरक्षित रक्कम शासनाने दिली नाही. २२ हजार रुपयांचे संरक्षण मिळणे अावश्यक असताना केवळ २२०० रुपये मिळाले अाहेत. तेदेखील कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्यात अाले. नव्या याेजनेत अपेक्षित असलेले संरक्षण खरेच शेतकऱ्यांना मिळेल का? याची शाश्वती नाही. साहेबराव पाटील, माजी अामदार

२५ जुलैपर्यंत माहिती द्या
पदे घेतली; पण पक्षासाठी काम करण्यास वेळ नसेल, तर अशांनी तातडीने पदे मोकळी करावी. केवळ कार्ड छापून पदे मिरवणाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करू नये. तसे केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच पक्षाने मागितलेली पदाधिकारी, कार्यकर्ते यांची माहिती तत्काळ सादर करावी. २५ जुलैपर्यंत माहिती सादर करणाऱ्या तालुकाधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. हवेत गाेळीबार करणारे नकाेत; काँक्रिट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचेही या वेळी वळसे-पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...