आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळे: 8 वर्षीय मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार करून खून, मृतदेह झाडीत सापडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे/दाेंडाईचा(ता.शिंदखेडा) - शहरातील टेकभिलाटी परिसरात राहणाऱ्या अाठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात अाला. शुक्रवारी बालिकेचा मृतदेह परिसरातील काटेरी झुडुपांत अाढळून अाला. याप्रकरणी पाेलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्कार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. अाराेपीच्या शाेधासाठी तीन पथकांची नियुक्ती केली गेली अाहे.
टेकभिलाटी परिसरात राहणारी अाठ वर्षीय मुलगी अापल्या अाजी, मामा, मावशीकडे राहत हाेती. भंगार गाेळा करून ती अापल्या घरातील लाेकांना मदत करीत असे. गुरुवारी ती परिसरात भंगार गाेळा करीत असताना अचानक गायब झाली. तिचा परिसरात शाेध घेऊनही कुठेही ती अाढळून अाली नाही. मात्र, शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरातील काटेरी झुडुपांत एका बालिकेचा मृतदेह असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी काटेरी झाडांत सदर मुलीचा मृतदेह हाेता. तिच्या अंगावरील कपडे फाटलेले हाेते. तसेच काही जखमाही दिसत हाेत्या. घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलविण्यात अाला. सदर मुलगी ही टेकभिलाटी येथील राहणारी असल्याचे समजल्याने पाेलिसांनी चाैकशी केली त्या वेळी सदर मुलीचे मामा, मावशीने मुलीचा मृतदेह अाेळखून तिच्याबाबत माहिती दिली. प्रथमदर्शनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला मारण्यात अाल्याचे दिसून अाले. त्यानुसार संबंधित मुलीच्या अाजीच्या तक्रारीवरून दाेंडाईचा पाेलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३०२नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास पाेलिस निरीक्षक प्रकाश मुंडे करीत अाहेत. मात्र, यातील अाराेपी अद्याप स्पष्ट न झाल्याने अाणि निवडणूक असल्याने कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून पाेलिसांकडून माहिती दडवून ठेवली जात हाेती.

अाईचा मृत्यू, वडील असतात नंदुरबारला : पीडित मुलीच्या अाईचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला अाहे, तर तिचे वडील नंदुरबार येथे कामाला असतात. त्यामुळे बालिका दाेंडाईचा येथे अाजीकडेच राहत हाेती. अाजी, मामाचीही परिस्थिती जेमतेम असल्याने भंगार गाेळा करून ती कुटुंबाला मदत करीत हाेती. त्यामुळे भंगार गाेळा करणाऱ्यांपैकीच किंवा परिसरातील काेणी तरी तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय अाहे. एका लहान मुलाने तिला काेणी तरी माेटारसायकलवर बसवून घेऊन जात असल्याचे पाहिले हाेते. मात्र, संबंधित मुलगा लहान असल्याने त्याला नेमकी माहिती सांगता येत नसल्याने तपासात पाेलिसांना अडचण हाेत अाहे.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या, चिमुकलीवर झाले अत्याचार...
बातम्या आणखी आहेत...