आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा विवाह शनिपेठ पाेलिसांनी राेखला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अासाेदा रस्त्यावरील वडामळा परिसरातील तानाजी मालुसरेनगरात साेमवारी दुपारी १२.३० वाजता एक विवाह हाेणार हाेता. वधू अल्पवयीन असल्याबाबत शनिपेठ पाेलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सकाळी ११ वाजताच विवाहस्थळ गाठले. मुलीला पाेलिसांनी वय विचारले असता तिने १५ वर्षे सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी वर-वधूला पाेलिस ठाण्यात अाणून विवाह राेखला. तसेच दाेन्ही पक्षांना नाेटीस देऊन साेडण्यात अाले.

तानाजी मालुसरेनगरातील ज्ञानेश्वर काेळी यांचा मुलगा किशाेर याचा विवाह सुटकार (ता.चाेपडा) येथील मुलीशी ठरला हाेता. त्यांचा विवाह साेमवारी दुपारी १२.३० वाजता वडामळा परिसरात हाेणार हाेता. शनिपेठ पाेलिसांनी साेमवारी सकाळी १०.५० वाजता निनावी फाेनद्वारे वधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानंतर पाेलिस उपनिरीक्षक पवन राठाेड, अनिता बागुल, याेगेश बाेरसे, अयूब खान, शेखर पाटील यांनी विवाहस्थळी जाऊन विवाह राेखला. मुलीला तिची जन्मतारीख विचारली असता तिने जून २००१ सांगितली. त्यामुळे पाेलिसांनी वर-वधूला पाेलिस ठाण्यात अाणले. पाेलिसांनी वर-वधू अाणि दाेन्ही पक्षांच्या प्रत्येकी दाेघांचे जबाब घेऊन १४९ ची समज नाेटीस देऊन साेडून दिले.