आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच भारतात आली मिस वर्ल्ड, मिस UK सोबत लुटला नृत्याचा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१४ ची मिस वर्ल्ड रोलीन स्ट्रॉस आणि मिस इंग्लंड कॅरिना टायरेल यांनी बुधवारी धुळे जिल्ह्यात शिरपूर पॅटर्न म्हणून ओळख असणार्‍या बंधार्‍यांची पाहणी केली. शिरपूर परिसरातील दौर्‍यात आदिवासी पद्धतीने झालेल्या पाहुणचाराने विश्वसुंदरी भारावून गेली. दिवसभर आदिवासी बांधवांमध्ये वावरताना ती त्यांच्यात रमून गेली होती.

विश्वसुंदरी रोलेन स्ट्रॉस आणि मिस इंग्लंड कॅरीना टायरेल यांच्या शिरपूर दौर्‍याचा दुसरा दिवस सकाळी आठ वाजता आमदार काशिराम पावरा यांचे गाव सुळे येथून सुरू झाला. रोलेन यांनी या वेळी आदिवासी महिलांचे चांदीचे दागिने घातले. त्यानंतर चांगलेच जड असल्याचे सांगितले. त्यानंतर लाकड्या हनुमान येथे जाऊन त्यांनी आदिवासी लोकांची देवता देवमोगरा मातेचे दर्शन घेतले. यावेळी आदिवासी तरुण-तरुणींनी आदिवासी नृत्य सादर केले. या वेळी रोलेन कॅरीना यांनीही आदिवासी तरुणींबरोबर नृत्याचा आनंद लुटला.

मेडिकलच्या विद्यार्थिनींशी साधला संवाद
रोलेनकॅरीना या दोन्ही केंब्रिज विद्यापीठातील मेडिकलच्या विद्यार्थिनी आहेत. रोलेन या साऊथ आफ्रिकेच्या आहेत. एनएमआयएस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रोलेन म्हणाल्या की, मी बाबांच्या प्रेरणेने मेडिकलला प्रवेश घेतला आणि ग्लॅमरच्या दुनियेत योगायोगाने आले. इथपर्यंत आल्यानंतर आपण लोकांसाठी काहीतरी करावे, या भावनेतून काम करू लागले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा PHOTOS
बातम्या आणखी आहेत...