आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर साेडून अालेल्या मुलीला पाहून अाई-वडील गहिवरले, मुलीच्या इच्छेप्रमाणे पुण्यात शिक्षण देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोलिस अधिकारी बनण्यासाठी पिंपरी चिंचवड येथून ३० मार्च रोजी घर सोडून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी गुरुवारी सकाळी १० वाजता पालकांसह स्वगृही परतली. तिला पाहिल्यानंतर आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.
वैशालीला (नाव बदललेले अाहे) पोलिस अधिकारी व्हायचे होते. मात्र, घरच्यांनी तिचे लग्न २९ एप्रिल रोजी करण्याचे ठरवले होते. तत्पूर्वीच तिने घरातून पलायन केले होते. मंगळवारी जळगाव बसस्थानक परिसरातून शरद मोरे यांनी तिला ताब्यात घेऊन बुधवारी एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्द केले होते. पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधून वैशालीच्या पालकांना बोलावून घेतले होते. तिचे पालक शुक्रवारी सकाळी वाजता एमआयडीसी ठाण्यात पोहाेचले. त्यानंतर १० वाजता ते तिला घेऊन पुण्याकडे निघून गेले. त्यांनी मुलीच्या तिच्या इच्छेप्रमाणे तिला शिक्षण करू देण्याचा निर्णय घेतला. तसेच तिचे लग्न तूर्त करण्याचाही निर्णय घेतला आहे.

मुलीच्या इच्छेप्रमाणे पुण्यात शिक्षण देणार
वैशालीलाशिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे तिने घरातून पलायन केले होते, हाच मुद्दा पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी पालकांना समजावून सांगितला. पालकांनीदेखील कुराडे यांचे म्हणणे एेकून घेत वैशालीला ११ वीपासून पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणार असल्याची ग्वाही दिली. विद्यार्थी सहायता समिती, कमवा शिका योजनेंतर्गत शिकवून तिला मोठी अधिकारी करू, असे त्यांनी कुराडे यांना सांगितले.