जळगाव - जुन्या जळगावातील आंबेडकरनगरात गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोन रिव्हॉल्व्हरचा वापर झाला आहे. या रिव्हॉल्व्हर मधून एकूण चार राऊंड फायर झाले असून पोलिसांनी दोन काडसुते जप्त केल्या आहेत; तर हल्ल्यातील संशयित सचिन सैंदाणे हा दोन्ही रिव्हॉल्व्हरसह बेपत्ता झाला असल्याचे शुक्रवारी पोलिस चौकशीत समोर आले आहे.
चंद्रमणी तायडे यांच्या घराला पाेलिसांनी लावलेले सील
घटनास्थळ केले सील : घटनेच्यादुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी सचिन सांगळे, शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी आंबेडकरनगरातील गोविंद सोनवणे यांच्या घरी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी त्यांना घराच्या दाराला गोळी लागल्याचे निशाण, घरात रक्ताचे डाग, फुटलेल्या काचा दिसून आल्या.
नागरिकांकडून चौकशी : परिसरातीलनागरिकांकडून घटनेबाबत चौकशी केली असता, संशयित दोन रिक्षांमधून आल्याची माहिती मिळाली. संशयितांकडे दोन रिव्हॉल्व्हर असल्याचे समजून आले आहे. गोळीबार झालेले घटनास्थळ म्हणजेच गोविंद सोनवणे यांच्या घराला पोलिसांनी सील केले. तसेच परिसरातील काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दुपारपर्यंत चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.