आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात सफाई मिशनसाठी ८७० कामगारांचा ताफा, कचरा वेचणाऱ्यांचे सर्वेक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्याकाही दिवसांत शहरात निर्माण झालेली अस्वच्छता ठिकठिकाणी असलेले कचऱ्याचे ढिगारे अाता नाहीसे हाेणार असल्याचे अाशादायी चित्र निर्माण केले जात अाहे. महापालिकेने अास्थापनेवरील ५२० कामगारांच्या साेबतीला मक्तेदाराकडील ३५० कामगारांनाही ‘सफाई मिशन’साठी रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यासाठी कामगार पुरवण्याचे कार्यादेश गुरुवारी मक्तेदार लहू पर्वते यांना देण्यात अाले. त्यामुळे डिसेंबरपासून शहरात कचरा साचणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे.

शहरातील साफसफाईच्या विषयावरून गेल्या दाेन महिन्यांपासून जाेरदार राजकारण पेटले हाेते. एकमेकांवर अाराेप-प्रत्याराेप करण्यासह कुरघाेडी करण्यात दिवाळीचा सणदेखील निघून गेला. तसेच अधिकारी पदाधिकारी घाेषणा करत राहिले; परंतु प्रत्यक्षात स्वच्छ िनर्मळ वातावरण तयार करण्यात सर्वांनाच सपशेल अपयश अाले. शहरात कचऱ्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा वाढले असून, साफसफाईकडे प्रचंड दुर्लक्ष हाेत अाहे.

या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी खान्देश विकास अाघाडीने एकमुस्त पद्धतीने साफसफाईचा ठेका देण्याचा निर्णय घेतला असून, महासभेत हा विषय मंजूर झाला अाहे. मात्र, या सर्व प्रक्रियेला अजून महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता अाहे. त्यामुळे शहरात अाणखी भयावह स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता गृहीत धरून एकमुस्त ठेका सुरू हाेईपर्यंत मक्तेदाराने ३५० कामगारांचा पुरवठा करावा, असा निर्णय घेण्यात अाला अाहे.
केवळ महापालिका कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहरातील प्लास्टिक कचरा गाेळा करता पुण्याच्या धर्तीवर शहरातील कचरा वेचणाऱ्यांचे (रॅगपिकर) सर्वेक्षण करून त्यांनाच यासाठी प्राेत्साहन देण्याचा विचारही प्रशासन करत अाहे. त्यामुळे प्लास्टिक, काेरडा अाेला कचरा सहज वेगळा करणे शक्य हाेणार अाहे. कचरा वेचणाऱ्यांना त्यातल्या त्यात प्लास्टिक भंगार गाेळा करणाऱ्यांनाच याची जबाबदारी साेपवण्याबाबत चर्चा सुरू अाहे.

बाेगस हजेरीला लगाम
प्रभागनिहाय ठेक्यादरम्यान मक्तेदारांनी कामगारांची नियुक्ती करताच िबले काढल्याचा अाराेप करण्यात अाला हाेता. त्यामुळे अाता ३५० कामगारांच्या पुरवठ्यादरम्यानही असाच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामी, प्रशासनातील अधिकारी बाेगस हजेरी नाेंदवत असतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार अाहे. तसेच दरराेजच्या हजेरीचा रिपाेर्ट सकाळी ११ वाजेपर्यंत अाराेग्य अधिकाऱ्यांमार्फत उपायुक्तांना दिला जाणार अाहे.

३५० कामगारांचे नियाेजन
प्रभागसमिती १मध्ये - १०९ कामगार
प्रभाग समिती २मध्ये - १०५ कामगार
प्रभाग समिती ३मध्ये- ७३ कामगार
प्रभाग समिती ४मध्ये - ६३ कामगार
१४ - अाराेग्य विभागाचे युनिट
अाशादायी चित्र; साफसफाईला डिसेंबरपासून येणार गती

महिन्याला२२ लाखांचा खर्च
३५०कामगार पुरवण्याचे कार्यादेश मक्तेदार पर्वते यांना दिले असून, प्रतिकामगार मासिक ६,३५० रुपये खर्च येणार अाहे. त्यावर ३० दिवसांसाठी तब्बल २२ लाख २२ हजार रुपये खर्च येणार अाहे. त्यातून शहरातील साफसफाईचे नियाेजन करण्यात अाले अाहे. पालिका अास्थापनेवरील कायम ५२० अाता ३५० अशा एकूण ८७० कामगारांमुळे साफसफाईला डिसेंबरपासून गती येणार अाहे. याबाबत मक्तेदार पर्वते यांच्याशी दाेन दिवसांत करार करण्यात येणार अाहे.