आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मितेशने केला 3 हजार फुटांचा ‘लिंगाणा सुळका’ सर, चार मैल लांबीची चढण अाणि 2 हजार 969 फूट उंचीचा सुळका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंगाना सुळका सर करताना जळगावचा मितेश मोमाया. - Divya Marathi
लिंगाना सुळका सर करताना जळगावचा मितेश मोमाया.
जळगाव : रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असलेला तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा सुळका अवघ्या एक तास ४० मिनिटात पुण्याच्या चार मित्रांसमवेत जळगावच्या मितेश मोमाया युवकाने सर केला आहे. ताेरणा रायगड किल्ल्यादरम्यान असलेल्या हा सुळका गिरीदुर्ग प्रकारातील असून त्याची उंची 2 हजार 969 एवढी अाहे. सुळ्यावर यशस्वीरीत्या पोहोचलेली टीम येत्या अाॅक्टाेबरमध्ये शिवलिंग शाेध मोहीम राबवणार अाहे.
 
लिंगाणा सुळ्याची उंची अाणि राैद्र रूपाची महती वर्णन केली अाहे. पद्मश्री ना. धाें. महानाेर यांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटात लिंगाेबाचा डाेंगर अाभाळी गेला अन् ठाकर गडी तिथं कधी नाही गेला’ या अाेळीत वर्णन केले अाहे. यावरून हा सुळका किती अवघड अाहे याची जाणीव हाेते. पट्टीच्या प्रशिक्षित गिर्याराेहकांच्या प्रशिक्षणाचाही येथे कस लागताे. लिंगाच्या अाकाराचा असलेला हा सुळका महाडपासून ईशान्य दिशेला १६ मैलांवर, तर ताेरणा रायगडाच्या दरम्यान अाहे. मितेशसह पुणे येथील चार गिर्याराेहक मित्रांच्या टीमने 11, 12 जूनला ही माेहीम राबविली. कीर्ती अाेसवाल, कृष्णा पांचाळ, प्रा. केतकी बेहले या टीमने तास ४० मिनिटात लिंगाणा सर केला. 
 
अाॅक्टाेबरमध्ये अाठवडाभराची मुक्कामी शाेध माेहीम 
सुळक्यावर शिवलिंग असल्याचे मानले जाते. मात्र, या मोहिमेत या टीमला तेथे काहीही अाढळले नसल्याचे मितेश यांनी सांगितले. लिंगाण्यावर पाण्याच्या टाक्या अाढळल्या. या टाक्यात पाणी कसे भरले जाते याबाबत उत्सुकता अाहे. हे शिवलिंग रॅपलिंग करत शिवलिंग शाेधण्याची माेहीम ही टीम येत्या अाॅक्टाेबर महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात राबवणार अाहे. त्यासाठी अाठ दिवस सुळक्यावर मुक्काम करणार असून या टीममध्ये डाॅक्टर, छायाचित्रकार यांचाही समावेश असणार अाहे. या माेहिमेत सुळक्यावरून खाली रॅपलिंग करत शिवलिंगाचा शाेध घेतला जाणार अाहे. या माेहिमेसाठी पुरातन विभागाची परवानगी मागितली अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...