आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात बनावट दारुचा कारखाना उध्वस्त; 2 लाखांचा माल जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ : भुसावळ शहरातील गायत्रीनगरमध्ये असलेला बनावट दारुचा कारखाना सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने शनिवारी दुपारी २ वाजता कारवाई करून उध्वस्त केला.
 
सुरेश पुरण भाईदासानी याच्या गायत्रीनगरातील घरामध्ये हा काळा धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच नीलोत्पल यांनी सापळा रचून कारवाई केली. त्यात सुमारे ५० पेक्षा जास्त बॉक्समध्ये देशी-विदेशी दारुचा साठा आढळला.
 
याच घरात बनावट दारु तयार करून त्याची बाटल्यांमध्ये पॅकिंग करून विक्री होत असल्याचेही समोर आले आहे. आज दुपारपर्यंत पोलिसांनी दीड ते दोन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यात कच्ची दारु, रसायन, दारुच्या रिकाम्या बाटल्या, बूच, स्टीकर, सिलिंगटेलचा समावेश असून मुख्य आरोपीला पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...