आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमकेसीएलने केले 1 कोटी तरुणांना संगणक साक्षर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यातील 1 कोटी युवांना संगणक प्रशिक्षण देण्यासह २५ हजार युवकांना एमकेसीएलने स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे. यासह कोटी नागरिक संगणक साक्षर झाले असल्याने एमकेसीएलची ही मोठी गरूड झेप आहे. बिहार राज्यातही नुकताच प्रशासनाशी करार होऊन कोटी युवांना कौशल्य विकास, संगणक साक्षरता, संवाद कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासह ईशान्यकडील राज्यांमध्ये ज्ञान मंडळाचे नेटवर्क उभे केले जाणार अाहे, अशी माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कार्यकारी संचालक विवेक सावंत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया अंतर्गत देशभरात माहिती तंत्रज्ञानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातही गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु असलेले एमकेसीएलचे कार्य पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. मध्यंतरीच्या काळात एमकेसीएलच्या कार्यपद्धतीवर बिनबुडाचे आरोप झालेत. मात्र, हे आरोप सिध्द करण्यासाठी एकही पुरावा सिद्ध झाला नाही. यानंतर स्पर्धात्मक पद्धतीने पुन्हा एमकेसीएलची निवड झाली. विविध विद्यापीठांनीही यास मान्यता दिली आहे. कंपनीला काम देण्यासंबंधीच्या निर्णयाबाबत शासनाच्या अध्यादेशाचा चुकीचा अर्थ लावला होता. मात्र, विविध शाखांच्या ऑनलाइन प्रवेशासह पारदर्शी परीक्षेची कामे यशस्वीपणे पार पाडली आहेत. त्यामुळे शासनाने ३० जुलैच्या करारानुसार एमकेसीएलला पुनर्जीवित केले.
भांडवल उपलब्ध झाले पाहिजे
राज्यातकौशल्य विकासाचा विस्तार होण्यासाठी संगणक केंद्र विस्तारित झाले पाहिजे, यासाठी मात्र शासनाने या विनाअनुदानित केंद्राना भांडवल उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. नुकताच बिहार राज्यासोबत हजार संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा करार झाला आहे. यासह ईशान्यकडील मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, आसाम या राज्यामध्येही ज्ञान मंडळाचे नेटवर्क वाढवले जाणार आहे. राज्य शासनाकडूनही कंपनीस प्रतिसाद मिळत असून राज्यात डिजिटल इंडिया अंतर्गत हजार सेमिनार घेऊन कौशल्य विकासाचा प्रचार करण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात महाआयटी जिनियस स्पर्धा होणार आहे. या वेळी विवेक खडसे उपस्थित हाेते.

आगामी काळात राज्यात नवीन सेंटर तयार केले जाणार आहेत. या अंतर्गत हजार पदे भरली जाणार असून यासंबंधीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली अाहे. दरवर्षी एमकेसीएलच्या माध्यमातून लाख मुले संगणक प्रशिक्षित होत आहेत. राजस्थान, हरियाणा, अोरिसा, बिहारमध्येही कंपनीच्या विस्ताराचे कार्य सुरू आहे. डिजिटल युनिव्हर्सिटी सॉफ्टवेअरमध्ये ६० लाख विद्यार्थ्यांना प्रवेश पदवी प्रमाणपत्राची सेवा तर कोटी २५ लाख विद्यार्थांना ऑनलाइन प्रवेश दिला. तसेच कोटी ऑनलाइन नोकर भरतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनाच्या संगणकीकरणाबद्दल भारताने बेस्ट ई- गव्हर्नर अवॉर्ड दिला.
बातम्या आणखी आहेत...