आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार डाॅ. पाटील, संताेेष चाैधरींनी घेतली माजी मंत्री सुरेश जैन यांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - साडेचार वर्षांनंतर कारागृहातून जामिनावर बाहेर पडलेले माजी अामदार सुरेश जैन यांची भेट घेण्यासाठी मंत्री, अामदार यांच्यासह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या निवासस्थानी अाेघ सुरूच अाहे. साेमवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील अाणि माजी अामदार संताेष चाैधरी यांनी जैन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. संताेष चाैधरी यांच्यासाेबत त्यांचे चिरंजीव सचिन चाैधरी हे देखील उपस्थित हाेते. तसेच शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार साहेबराव पाटील, डाॅ. बी.एस.पाटील, दिलीप वाघ, डॉ. जी.एन.पाटील, गफ्फार मलिक, शरद वाणी यांनीही भेट घेतली. गेल्या दाेन दिवसांपासून जिल्ह्यातील अाजी-माजी मंत्री, अामदार यांनी जैन यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.
बातम्या आणखी आहेत...