आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार निधीतील कामांवरून ओढाताण सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; महापालिकाक्षेत्रात अाधीच विकासकामांची बाेंबाबाेंब असताना अाता अामदार निधीतील कामांवरून ओढाताण सुरू झाली अाहे. नियमानुसार निविदांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकली जाते. त्याबाबत जाहिरातही प्रसिद्ध झाली. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनातूनच लपवालपवीचा डाव खेळण्यात अाला. यामुळे महापालिका प्रशासनाच्या भूमिकेबद्दलही आता संशय निर्माण झाला अाहे.
अामदार सुरेश भाेळे अामदार डाॅ.गुरुमुख जगवानी यांच्या निधीतून शहरात अारसीसी गटारींची सुमारे ५३ लाखांची कामे मंजूर झाली अाहेत. या कामांसाठी महापालिकेने स्थानिक वृत्तपत्रात नाेंदणीकृत मक्तेदारांसाठी सूचना प्रसिद्ध केली हाेती. त्यात महापालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम िवभागातील २६ कामे करायची असल्याने जाहीर निविदा सूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याचे म्हटले हाेते. ही जाहिरात सप्टेंबर राेजी प्रसिद्ध झाल्यानंतर सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर ही निविदाच टाकण्यात अालेली नसल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे मंगळवारी प्राप्त झाली आहे. यामुळे महापालिकेत सुरु असलेला सावळा गोंधळ समोर आला आहे.

नवीन वाद
संबंधित अधिकाऱ्यांना अादेश दिले

बांधकामासंदर्भात निविदा प्रसिद्ध केल्यानंतर ती संकेतस्थळावर टाकणाऱ्या संबंधितांना जाब विचारण्यात आला अाहे. तसेच यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे अालेल्या तक्रारीची दखल घेण्यात अाली अाहे. त्यामुळे अाता नव्याने निविदा टाकून मक्तेदारांना प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचे अादेश दिले अाहेत. प्रदीपजगताप, उपायुक्त
अधिकारी, कर्मचारी यांची कानउघाडणी
तक्रारीनंतरउपायुक्तांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना बाेलावून सुनावले. तसेच निविदा संकेतस्थळावर का टाकण्यात अाली नाही? याचीही विचारणा केली. लवकर निविदा प्रसिद्ध करून मुदतवाढ द्यावी, अशा सूचनाही या वेळी त्यांनी दिल्या.

अाश्वासनांचीपूर्तता
विधानसभानिवडणुकीदरम्यान नागरिकांनी अामदार भाेळे यांच्याकडे अनेक मागण्या केल्या हाेत्या. त्यात गटारी बांधणे, स्लॅब कर्ल्व्हट बांधणे, अारसीसी गटार बांधणे, रस्ता काँक्रिटीकरण करणे अादी कामांचा समावेश हाेता. त्यानुसारच अामदार भाेळे यांनी सध्या कामांना प्राधान्य दिल्याचे सांगितले जात अाहे.

प्रशासनालाहाताशी धरून लपवालपवी
जाहीरनिविदा संकेतस्थळावर टाकण्यामागे ५० हजारांपासून ते तीन लाखांपर्यंतची कामे ठरावीक चेहऱ्यांना िमळावीत कार्यकर्ते अार्थिक सक्षम व्हावेत, असा हेतू असल्याचे बाेलले जात अाहे. त्यातून प्रशासनाला हाताशी धरून ही लपवालपवी झाल्याचे बाेलले जाते.