आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार गिरीश महाजनांचे राजकीय सीमोल्लंघन, ग्रुपतर्फे मंत्र्यांचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गणेशोत्सवात मनपाच्या मानाच्या गणपतीच्या आरतीनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी खाविआचे नगरसेवक तथा उपमहापौर सुनील महाजन यांच्या जय दुर्गा ग्रुपच्या मंडळात जाऊन देवीची आरती केली. महाजनांच्या स्वागतासाठी ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या राजकीय घडामोडींमुळे आता महाजन यांचे जळगावात खऱ्या अर्थाने राजकीय सीमोल्लंघन झाल्याची चर्चा आहे.
सादरे अात्महत्या प्रकरणात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कथित आरोप होत आहेत. यामुळे खडसे अडचणीत असल्याचे राजकीय विश्लेषकांची मते आहेत. हीच वेळ साधत गिरीश महाजन यांनी जळगाव शहरात धडाकेबाज पद्धतीने एंट्री केली अाहे. मनसेचे ललित कोल्हेंच्या एल.के.फाउंडेशनतर्फे आयोजित रावण दहनाचा कार्यक्रमही यंदा महाजन यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने शहरभर होर्डिंग झळकत आहेत. महापालिकेत राजकीय खलबते सुरू आहेत. तसेच खाविआ, मनसे नगरसेवकांची गिरीश महाजन यांच्याशी जवळीक वाढत असल्याचे बोलले जात आहे.

१४मीनिटे भेट : जलसंपदामंत्रीमहाजन वाजून २० मीनिटांनी मेहरूणमध्ये पोहोचले. गाडीतून उतरताच उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक नितीन लढ्ढा, स्थायी सभापती नितीन बरडे, मनसेचे ललित कोल्हे, अश्विन सोनवणे, अजय पाटील यांनी महाजनांचे स्वागत केले. पाच हजार फटाक्यांची लड आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर दणाणून गेला हाेता. तीन ते चार मीनिटांत हा ताफा मंदिरात पोहोचला. या ठिकाणी चार मीनिटांत दोन आरत्या झाल्या. आरतीनंतर मंदिराच्यात ओट्यावर महाजनांचे स्वागत झाले.
मंदिरासमोरील आरास पाहण्यासाठी महाजनांची विनंती करण्यात आली. मात्र, वेळेअभावी त्यांनी विनंती स्वीकारता मोर्चा गाडीकडे वळवला. १४व्या मीनिटाला महाजनांची गाडी परतीच्या प्रवासाला लागली होती. या संपूर्ण वेळेत त्यांनी कोणाशीही खासगीत चर्चा केली नाही.
आरतीसाठी जाताना गिरीश महाजन, सोबत नितीन लढ्ढा, सुनील महाजन, अश्विन सोनवणे, ललित कोल्हे.

आगामी काळात पडसाद
आरतीचाकार्यक्रम झाल्यानंतर गिरीश महाजनांना निरोप देताच सुनील महाजन यांनी सुस्कारा सोडला. याचदरम्यान काही पत्रकारांनी सुनील महाजन यांना या भेटीबद्दलचे गूढ विचारले. मात्र, गूढ काही नव्हते. आपण केलेल्या या नियोजनाचे पडसाद येणाऱ्या काळात दिसतील, असे त्यांनी हसत-हसत सांगितले. एका प्रकारे या भेटीला अनेक अर्थांनी महत्त्व असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

आज रावण दहन
एल.के.फाउंडेशनतर्फे गुरुवारी सायंकाळी वाजता मेहरूण तलाव येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी महापौर राखी सोनवणे, सुनील महाजन, नितीन बरडे, रमेश जैन, विजय कोल्हे, सिंधू कोल्हे, खुशबू बनसोडे, वामनराव खडके, नरेंद्र पाटील, अश्विन सोनवणे उपस्थित राहतील, असे ललित कोल्हे यांनी कळवले आहे.