आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबरावांचे मंत्रिपद अद्याप निश्चित नाही, संपर्कप्रमुखांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आमदार गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदाविषयी अद्याप कोणताही अंतिम निर्णय नसून, शिवसेना पक्षप्रमुखच याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पद्मालय विश्रामगृहात रविवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यातील वाद विकोपाला जात असल्याची स्थिती आहे. मात्र, हा वाद शिवसेनेने सुरू केलेला नाही. दोन पक्षांत चाललेली ही राजकीय ओढाताण असली तरी, शिवसेना हा विनाकारण काहीही ऐकून घेणारा पक्ष नाही. पक्षाचे अस्तित्व संपवू पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याची शिवसेनेची पद्धत आहे. मात्र, या वादामुळे समाजात तेढ वाढू नये यासाठी कोणी पुढाकार घेवो अथवा घेवो, आमचा पक्ष याची काळजी घेणार आहे. हा विषय पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहाेचवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार या विषयावर काम केले जाणार आहे.

ठेवीदारांसाठी निधी अशक्य
राज्यमंत्रीदादा भुसे म्हणाले, राज्यात साडेपाच हजार पतसंस्था अडचणीत आहेत. यासंबंधी मंत्रालयात आढावा बैठका घेतल्या. त्यानुसार ठेवीदारांची रक्कम देण्याविषयी नियोजनाबाबत सूचना दिल्या अाहेत. तसेच कर्जाचे व्याजदर, अहवाल, नियमावली तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी २०० कोटी रुपये दिले होते. मात्र, या रकमेची अल्प परतफेडही झालेली नाही. त्यामुळे पुन्हा यासाठी निधी उभारणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मक्तेदारी चालणार नाही
मंत्रीआमदारांतील वाद ही दोन पक्षांतील समज-गैरसमजातून सुरू असलेली ओढाताण आहे. मात्र, दोन्ही पक्ष स्वतंत्र सत्तेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आमचीच मक्तेदारी म्हणू पाहत असलेल्यांची मक्तेदारी खपवून घेतली जाणार नाही. ‘अरे’ला ‘का रे’ने उत्तर देणारा शिवसेना पक्ष आहे. वाद सुरू करणाऱ्यांनीच याबाबत आत्मपरीक्षण करावे, असेही मिर्लेकर म्हणाले. पत्रकार परिषदेस आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, तालुकाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...