आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांना मदत न मिळाल्यास 17 फेब्रुवारीला मोर्चा : गुलाबराव पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे अामदार गुलाबराव पाटील जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला अाले हाेते. मात्र, जिल्हाधिकारी बैठक संपवून घराकडे निघाल्या हाेत्या. त्या वेळी अामदार पाटील यांनी त्यांना चर्चेसाठी माघारी बाेलावले. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळाल्यास १७ फेब्रुवारी राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले अाहे. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी शिवसेनेचे अामदार गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना भेटण्यासाठी अाले हाेते.
मात्र, िजल्हाधिकारी िजल्हा नियाेजन समितीच्या सभागृहातील बैठक अाटाेपून घराकडे िनघाल्या हाेत्या. त्यांना अामदार पाटील यांनी चर्चेसाठी माघारी बाेलावले. त्या वेळी अग्रवाल यांनी शासनाकडून िनधी प्राप्त झाल्याने गतवेळेच्या नुकसान भरपाईची मदत देता अाल्याचे सांिगतले. तसेच धरणगाव तालुक्याच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अितरिक्त तलाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले. िवरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माेर्चे, अांदाेलने करता येतात. मात्र, सत्तेत अाहाेत. त्यामुळे मर्यादा येतात. तरीही शेतकऱ्यांसाठी १७ फेब्रुवारीला रस्त्यावर उतरणार असल्याचे अामदार पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना सांिगतले.

धरणगावतालुक्यात ८० टक्के नुकसान :
मंगळवारीरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणगाव तालुक्यातील मका, केळी, दादर, गहू, हरभरा, बाजरी अािण कांद्याचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले अाहे. जळगाव तालुक्यात २०१३-१४ या वर्षी काेटी लाख रुपयांचे नुकसान झाले हाेते. तसेच या वर्षी जवळपास काेटींची नुकसान भरपाई िमळालेली नाही. धरणगाव तालुक्यातील काेटींची नुकसान भरपाई अजूनही िमळालेली नाही, असे अामदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

क्राॅम्प्टनवर माेर्चा
सध्यापरीक्षांचा कालावधी अाहे. तरीही ग्रामीण भागातील भारनियमन कमी हाेत नाही. त्यामुळे गुरुवारी क्राॅम्प्टनच्या मुख्य कार्यालयावर माेर्चा काढण्यात येणार अाहे.