आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्र प्रकरण: शिवसेनेचे अामदार गुलाबराव पाटील न्यायालयीन काेठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बनावट कागदपत्र प्रकरणी अटकेत असलेले जळगाव ग्रामीण मतदार संघाचे शिवसेनेचे अामदार गुलाबराव पाटील यांना शुक्रवारी न्यायालयीन काेठडी सुनावली अाहे. त्यांच्या
म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत बनावट कागदपत्र सादर करून सभासद केल्याने तसेच प्राेसिंडींगवर मृत सभासदाच्या स्वाक्षरी केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अामदार गुलाबराव पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल अाहे.
याप्रकरणी अाैरंगाबाद खंडपीठाने अामदार पाटील यांचा 13 जून राेजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने ते गुरुवारी सकाळी 11 वाजता न्यायालयाला शरण अाले. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 1 दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली हाेती. रात्रभर अाैद्याेगिक पाेलिस ठाण्यातील काेठडीत घालविल्यानंतर अामदार पाटील यांना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता जिल्हा न्यायालयात अाणण्यात अाले. यावेळी शिवनेनेचे कार्यकर्त्यांची माेठी गर्दी हाेती. न्यायमूर्ती एम.एस देवरे यांच्या न्यायालयात त्यांना उभे केले असता त्यांना न्यायालय काेठडीत ठेवण्याचा अादेश देण्यात अाला. दरम्यान, त्यांच्या जामिन अर्जावर दुपारी 3 वाजेनंतर निर्णय हाेणार हाेणार अाहे.