आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहीच जमले नाही म्हणून इतरांप्रमाणे राजकारणात नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - आपण उच्चशिक्षित आहोत. स्वत:च्या कंपनीत गलेलठ्ठ पगार घेऊन 24 तास वातानुकूलित वातावरणात राहून जीवन जगू शकतो. तितकी आपली धमक आहे. अन्य काही पुढार्‍यांसारखे काहीच जमले नाही म्हणून राजकारणात आलेलो नाही. शिंदखेडा तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन राजकारणात उतरलो आहे, असे प्रतिपादन आमदार जयकुमार रावल यांनी केले.

शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथे भाजप शाखा फलक अनावरणासह आमदार निधीतून उभारण्यात येणार्‍या अमरधामच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष कामराज निकम, सरपंच बन्सीलाल निकम, खरेदी-विक्री संघाचे संचालक रघुनाथ पाटील, शाखेचे अध्यक्ष रमेश निकम, उपाध्यक्ष भटू निकम, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष र्शीराम बोरसे, सचिव राजेश जगताप, हिंमतसिंग गिरासे, लक्ष्मण पाटील, शालिग्राम पाटील, लोटन बोरसे, संतोष नगराळे, रूपसिंग नाईक, गुलाब बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार रावल म्हणाले की, आजकाल कोणत्याही क्षेत्रात यशस्वी न होणारी माणसे राजकारणात येतात. अशा ढोंगी पुढार्‍यांना जिल्ह्यात शिंदखेडा तालुका सर्वात सोपा वाटतो. म्हणूनच धुळ्यात राहून शिंदखेडा तालुक्याचे आमदार होण्याचे स्वप्न ही मंडळी पाहत आहेत. दादासाहेबांचे सुजलाम् सुफलाम् शिंदखेडा तालुक्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीत आहे. राज्यात तालुक्याला पहिल्या दहा क्रमांकामध्ये नेण्याचा आपला मानस आहे. त्यादृष्टीने तालुक्यात अनेक विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.

कार्यक्रमाला गुलाब मंत्री, बाळा पाटील आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी हातनूरला अमरधामच्या कामासाठी आठ लक्ष रुपये आमदार निधीतून तसेच खासदार प्रतापराव सोनवणे यांच्या खासदार निधीतून पाच लक्ष असे 13 लक्ष रुपयातून या ठिकाणी अमरधामची निर्मिती केली जाणार आहे.