आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाच्या निकालानंतरही गारपीट मदतीस विलंब, आमदार महाजन ठोकणार मुख्यमंत्र्यांवर दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 16 एप्रिलपर्यंत मदत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु जळगाव जिल्ह्याला 147 कोटींपैकी केवळ 45 कोटींची मदत मिळाली असून 30 टक्के लोकांपर्यंतही मदत पोहचलेली नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात गारपीट व अवकाळी पाऊस मोठय़ा प्रमाणात झाल्याने जीवित व वित्तहानी झाली होती. या गारपीटमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने सव्र्हेक्षण करून कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 10 हजार, बागायतीसाठी 15 हजार तर फळपिकांसाठी 25 हजार रुपये मदत जाहीर केली होती.