आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: अामदार शिंदेंनी दिली भाजप केमीस्ट पदाधिकाऱ्यांना दलालाची उपमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: भाजप केमीस्ट महासंघाने सुरू केलेल्या उपाेषणस्थळी अालेल्या अामदार जगन्नाथ शिंदेंनी थेट भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फुकटची लिडरशिप करू नका, ज्यांचे पैसे अाहेत त्यांना पुढे येऊ द्या, तुम्ही दलाली कशाला करतात असा अाराेप केल्याने वातावरण तापले हाेते. शिंदेंचे नेतृत्व असलेल्या एमएससीडीए लिमीटेडच्या शेअरवरून भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर जाेरदार शाब्दीक फटकेबाजी पाहायला मिळाली. 
 
 जळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर्स असाेसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी केमीस्ट भवन येथे झाली. यानिमीत्ताने अखिल भारतीय अाैषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष अामदार जगन्नाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती हाेती. या वेळी शिंदेंचे नेतृत्व असलेल्या कंपनीत सभासदांना त्यांच्या शेअर्सचे पैसे अदा केले जात नसल्याच्या कारणाने तसेच जिल्हा संघटनेतील अनियमितता व बेकायदेशिर व नियमबाह्य कामाचा निषेध करण्यासाठी भाजप केमिस्ट महासंघाच्यावतीने केमीस्ट भवनसमाेर एक दिवसीय उपाेषण करण्यात अाले. सभा अाटाेपल्यानंतर अामदार शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे व पदाधिकाऱ्यांना साेबत घेत उपाेषणस्थळ गाठले. या वेळी त्यांनी उपाेषणकर्त्यांना त्यांच्या लेखी मागण्या देण्याची सूचना करत चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला तसेच अांदाेलन संपवण्याचे अावाहन केले.  
 
 शिंदेंच्या फटकेबाजीने वातावरण तापले
 भाजप केमिस्ट महासंघाच्या उपाेषणकर्त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिंदेचे उपाेषणकर्त्यांनी सुरूवातीला नमस्कार करून स्वागत केले. शिंदे यांनी तुम्हाला काय राजकारण करायचे ते तुम्ही करा; परंतु फुकटची लिडरशिप करू नका. ज्यांचे पैसे अाहेत त्यांना पुढे येवू द्या. कंपनी लिमीटेड असून खासगी नसल्याचा खुलासा करत मिडीयासमाेर चुकीचे अाराेप करू नका. कंपनी नफा कमवण्यासाठी स्थापन केली नसून अाता कंपनीला चांगले दिवस अाल्याचे सांगितले. ज्यांचे पैसे घेणे अाहेत त्यांना पुढे येऊ द्या अशा शब्दात सुनावले. दरम्यान केमीस्ट बांधवांचे पैसे अाहेत त्यांना बाेलू दिले जात नाही, अावाज दाबण्याचा प्रयत्न केला जाताे असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी शाब्दीक चकमक वाढल्याने व्यासपीठावरील वातावरण तापले हाेते. दाेन्ही बाजुने समर्थक एकमेकांवर अाराेप करू लागले हाेते.  
 
 दलाल म्हणताच संताप
 चर्चा सुरू असताना अामदार शिंदेंनी थेट भाजप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दलाल असल्याचे संबाेधले. शेअर्सचे ४० लाख रूपये अदा केलेले असताना तुम्ही कशाला दलाली करतात असे शब्द उच्चारताच भाजप केमिस्ट महासंघाचे दीपक जाेशी, संजय नारखेडे, निषीकांत मंडाेरे, दिनेश येवले यांनी शिंदेंच्या वक्तव्याला अाक्षेप घेतला. चुकीचा शब्द वापरू नका असा इशारा दिला. दीपक जाेशींनी शिंदेंना उद्देशुन तुमच्या समाेर चित्र वेगळे असते पाठीमागे वेगळेच चालते असा खुलासा करत दलाल शब्दावरून शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला.  
 
 मंडपची चाेरीचा अाराेप
 केमीस्ट भवनाच्या भिंतीला लागून उपाेषणाचा मंडप टाकण्यात अाला हाेता; परंतु काही कार्यकर्त्यांनी ताे मंडप काढण्यासाठी भाजप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव अाणला. तसेच केमीस्ट भवनाच्या समाेर टाकलेला मंडप रात्रीतून चाेरून नेल्याचा अाराेप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. विराेधकांचा अावाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा अाराेपही या वेळी करण्यात अाला. उपाेषणाला प्रदेशाध्यक्ष किशाेर भंडारी, कनकमल राका, डाॅ. सतीष अागीवाल, साकीत चित्तलवाला, संजय नारखेडे, दिनेश येवले, नितीन इंगळे, नगरसेवक रवींद्र पाटील अादी उपस्थित हाेते.
 
बातम्या आणखी आहेत...