आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MLA Sures Jain Bail Reject To Delhi Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार सुरेश जैन यांना हादरा; सुप्रीम कोर्टानेही फेटाळला जामीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव/दिल्ली- जळगाव घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयीत आरोपी आमदार सुरेश जैन यांना सुप्रीम कोर्टाने हादरा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने जैन यांचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला.

सुप्रीम कोर्टात बुधवारी सकाळी 11 वाजता मुख्य न्यायमूर्ती अल्तमश कबीर, न्यायमूर्ती चलमेश्वर व न्यायमूर्ती विक्रमजित सेन यांच्यासमोर जैन यांच्या जामीन अर्जावर कामकाज सुरू झाले. जैन यांच्यातर्फे उदय ललीत व हरीश साळवे यांनी बाजू मांडली. सरकारतर्फे संजय खर्डे पाटील यांनी युक्तीवाद केला. त्रयस्थ अर्जदार नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या मार्फेत बी. एच. मार्लापल्ले यांनी बाजू मांडली.

दरम्यान, जैन यांचा जामीन अर्ज यापूर्वी जळगाव जिल्हा न्यायालयाने 6 ऑक्टोबरला, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानेते 17 डिसेंबरला फेटाळला होता. त्यानंतर 23 डिसेंबरला दिल्ली सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.