आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Suresh Bhole Confused Due To Encroachment In Jalgaon City

अतिक्रमणात अडकले आमदार भोळे अतिक्रमण कारवाईला चौथ्या दिवशीही "ब्रेक'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर दाणाबाजाराकडे वळलेल्या मनपा प्रशासनाला ब्रेक लावण्यात आला आहे. कारवाई पूर्वी व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याचे तसेच म्हणणे ऐकून घेण्याची वेळ आता हातोडा चालवणाऱ्यांवर आली आहे.
मंगळवारी व्यापारी हॉकर्ससोबत दोन वेगवेगळ्या बैठका होतील. एकीकडे शहरातील महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला गेला तर दुसरीकडे मतांचा आशीर्वाद दिलेल्या दुकानदारांसाठी झटताना मात्र आमदार सुरेश भोळेंना कसरत करावी लागत आहे. एकूण भोळे अतिक्रमणाधारकांना पाठिंबा द्यावा का प्रशासनाकडून बाजू घ्यावी या कात्रीत अडकले आहे.

मनपा पोलिसातर्फे शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. शहरातील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने उचललेल्या पावलांमुळे वाहतूक सुरळीत होत आहे. तर दुसरीकडे ज्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल देत आमदारकी बहाल केली; त्या दुकानदारांवर व्यापाऱ्यांवर कारवाईची वेळ आली. या व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी आमदार सुरेश भोळेंना शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठावे लागत आहे. त्यामुळे भोळेंची गोची झाली आहे. अतिक्रमण काढल्यामुळे जनतेतून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून संपूर्ण शहरच अतिक्रमणमुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना चार दिवसापासून ही मोहीम ठप्प आहे.

लोक सहभागातून खड्डे दुरुस्ती
दाणा जारातीलमुख्य चौकात गेल्या बऱ्याच वर्षांपासून गटारीवर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे दाणाबाजारात येणारे ट्रक अन्य वाहनांना वळण घेताना मोठी अडचण होते. त्यामुळे बऱ्याचदा वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या सहकार्याने तो खड्डा बुजवून गटारीवर स्लॅब टाकण्यात येणार आहे. तसेच दाणाबाजारात अनेक ठिकाणी रस्त्यात विजेचे पोल आहेत, ते रस्त्याच्या कडेला शिफ्ट करण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेला दोन्ही कामांसाठी इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या. पोल शिफ्टिंगसाठी क्रॉम्प्टनला पत्र देण्यात येणार आहे.

दुपारी झाली "एसपीं'कडे बैठक
सोमवारी दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या दालनात पालिकेचे उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात दाणाबाजारातील व्यापाऱ्यांच्या विनंतीनुसार त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा निर्णय झाला. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे. या बैठकीत अधीक्षक सुपेकर यांनी दाणाबाजारातील दुकानांची माहिती जाणून घेतली. यात काही कागदपत्रेही सादर करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दिलेले ओटे हे वजनकाटा ठेवण्यासाठी आहेत, तर पालिकेच्या दृष्टीने ओटे अतिक्रमणात येत आहेत.

रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यात व्यत्यय आल्यानंतर चौथ्याच दिवशी पुन्हा तोच प्रत्यय पालिकेतील कर्मचाऱ्यांना आला. दाणाबाजारातील ओटे वेदर शेड काढण्यासाठी जाणाऱ्या पथकाला थोडे थांबून घेण्याचा सल्ला देण्यात आला. दाणाबाजारातील व्यापाऱ्यांनी पालिका उपायुक्त तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन म्हणणे एेकून घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे सोमवारचा दिवस कोणतीही कारवाई करताच संपला.

अवघड दुखणे
सोमवारदेखील कारवाईविनाच; दाणाबाजारातील ओटे वेदर शेड काढण्यासाठी जाणाऱ्या पथकाला थोडे थांबून घेण्याचा देण्यात आला सल्ला; पोलिस अधीक्षकांकडे झाली तातडीची बैठक, व्यापारी अन्
आज बैठकीचे आयोजन
अतिक्रमणकाढण्यापूर्वी चर्चा करून व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी उपायुक्त प्रदीप जगताप यांच्या दालनात मंगळवारी सकाळी ११ वाजता दाणाबाजारातील व्यापाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. तर दुपारी वाजता हॉकर्सची बैठक होणार आहे. या वेळी कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.
राजकीय हस्तक्षेपाची चर्चा
बॉम्बेहॉटेलच्या अतिक्रमणासंदर्भात आमदार सुरेश भोळेंकडून दबाव आल्याचे सांगितले जात असताना सोमवारी पोलिस अधीक्षकांकडे झालेल्या बैठकीला सुद्धा आमदार भोळेंची उपस्थिती होती. पालिकेचे अधिकारी बैठकीला जाण्यापूर्वीच भोळे दालनात बसलेले होते. त्यामुळे दाणाबाजारातील कारवाईला ब्रेक लावण्यामागेही राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू आहे.