आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्य व्यावसायिक आमदार बनणार सराफा व्यापारी,जानेवारीत दुकानाच्या उद‌्घाटनाचा मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वर्षानुवर्षे मद्य व्यावसायिक म्हणून परिचित असलेले जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे आता ही ओळख बदलणार आहेत. सोने व्यापारी ही त्यांची आता नवी ओळख असणार आहे. यासाठी त्यांनी थेट सराफ बाजारात भागीदारीत सुवर्णपेढीचे काम सुरू केले आहे. िवधानसभा निवडणुकीला उभे राहिल्यामुळे दिवाळीत सुरू होणाऱ्या या सुवर्ण पेढीच्या उद्घाटनाला आता जानेवारी महिन्यात मुहूर्त लाभणार आहे.

मद्य व्यवसायात व्यवस्थापक : सुरेश भोळे हे भाजपचे नगरसेवक म्हणून जळगावकरांना परिचित असले तरी त्यापेक्षाही मद्य व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख मोठी आहे. विधानसभा निवडणूक लढवताना त्यांनी पत्नीच्या नावाने असलेल्या नीलम वाइन शॉपचे व्यवस्थापक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. आता हा व्यवसाय त्यांनी साडूकडे सोपवला आहे. मूळ वाघळी (ता. चाळीसगाव) येथील असलेले भोळे यांनी तेथे ३५ ते ४० म्हशी पाळून दुग्ध व्यवसायदेखील केलेला आहे.
आर. एल. ज्वेलर्स समोर शोरूम
सोने व्यवसायात उतरणारे भोळे यांनी सोनी या मित्रासोबत भागीदारी केली आहे. सोनी हे सराफा बाजारात कारागिरी करतात. जळगावात सराफा व्यवसायात १५० वर्षांची परंपरा असलेल्या आर. एल. ज्वेलर्सच्या समोर ५०० स्क्वेअर फुटांचे बहुमजली दालनाचे काम सुरू आहे. १७ जानेवारीला या शोरूमचे उद‌्घाटन होण्याची शक्यता आहे.

का होताय भोळे सोने व्यापारी?
भोळे हे अनेक प्रवचने ऐकण्यासाठी जातात. असेच १४ वर्षांपूर्वी ते विजयरत्नसुंदर महाराज यांच्या प्रवचनाला मित्र कांजी सोनी यांच्यासह गेले होते. त्या वेळी महाराजांची भेट घेतल्यावर स्वत:ची ओळख मद्य व्यावसायिक असल्याची दिल्यावर त्यांनी व्यवसाय बदलवण्यास सांगितले होते. तेव्हापासून ते सोने व्यापाराविषयी विचार करीत होते.