आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा करताना मनपा शाळेच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: योगा करीत असताना महापालिकेच्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजता यशवंतनगरात घडली. महापालिकेच्या शाळेतील कर्मचारी जयंत त्र्यंबक लाड (वय ४७, रा.यशवंतनगर, मूळ रा. पातोंडे, ता.अमळनेर) हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे यशवंतनगरातील घराच्या वरच्या मजल्यावर सकाळी वाजता योगा करीत होते. या वेळी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी याविषयी पत्नीला माहिती दिली. त्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जयंत लाड यांचा स्वभाव मिनमिळाऊ होता. त्यांच्या मित्रांचा गोतवळादेखील मोठा होता. त्यामुळे या घटनेने हळहळ व्यक्त होते आहे. 
बातम्या आणखी आहेत...