आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Activist Beat To Youth Issue At Jalgoan, Divya Marathi

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून युवकास बेदम मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ललित कोल्हे हे जळगावचे भावी आमदार आहेत. अशा आशयाचा फोटो आणि मजकुरावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचा राग येऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका युवकास मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कुशल दत्तात्रय महाजन (वय 28, रा. कोल्हेनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे.

महाजन याची भावना पॉलिर्मस नावाने चटईची कंपनी आहे. महाजन याचा मित्र प्रशांत पाटील याने शनिवारी दुपारी मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे हे जळगाव शहराचे भावी आमदार असल्याचा फोटो आणि मजकूर व्हॉट्सअँप या सोशल नेटवर्किंग साईटवरील ‘मी मराठी’ या ग्रुपमध्ये पोस्ट केला. महाजन याने या पोस्टवर नकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर काही वेळाने महाजन याला धमकीचे मॅसेज आले. मात्र, ग्रुप चॅट असल्यामुळे महाजनने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर रात्री 10 वाजता महाजनला मारहाण झाली. महाजन सध्या डॉ. ए.जी.भंगाळे यांच्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

मारहाणीत महाजन बेशुद्ध
महाजनला रात्री 9.45 वाजेच्या सुमारास मूजे महाविद्यालय परिसरातील आस्वाद कॉर्नर येथे सुमित कोल्हे आणि इतर दोघांनी अडविले. तेथून गणेशवाडी येथील बगिच्यात नेऊन आणखी सात-आठ जणांनी मारहाण केली. त्याचा मोबाइलही गहाळ केला. रविवारी महाजन याची प्रकृती ठीक झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबाब घेऊन तक्रार दाखल केली. यात सुमित कोल्हे यांच्यासह इतर दोन जणांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.

कारण माहीत नाही
संबंधित प्रकार माझ्या कानावर आला आहे. मात्र, मी जळगावात नसल्यामुळे या मारहाणीचे नेमके कारण अद्याप मला माहीत नाही. आल्यानंतर माहिती घेऊन बोलतो. ललित कोल्हे, जिल्हाध्यक्ष, मनसे