आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर कार्यकारिणीचा मनसेला पडला विसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सहा महिन्यांपूर्वी राज्यभरातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या होत्या. जळगाव शहर कार्यकारिणीही त्यावेळी विसर्जित झाली होती, जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्या असल्या तरी शहर कार्यकारिणीचा पदाधिकार्‍यांना विसर पडला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव शहर कार्यकारिणी पालिका निवडणुकीपूर्वी विसर्जित झाली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवीन पदाधिकारी नियुक्त करणे टाळण्यात आले होते. पालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही नवीन कार्यकारिणी संदर्भात पक्षात हालचाली सुरू झालेल्या नाही.

नवीन कार्यकारिणीसाठी काही जण इच्छुक असले तरी पक्ष पातळीवरून प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्तेही नाराज झाले आहेत.

अशी राहील रचना
पक्षाच्या नवीन रचनेनुसार महानगरांमध्ये 1 शहराध्यक्ष, 2 शहर उपाध्यक्ष असतील. 2 ते 3 वॉर्ड मिळून एक विभाग अध्यक्ष अशा प्रकारे शहरात 16 विभाग अध्यक्ष, प्रत्येक वॉर्डात 1 शाखाध्यक्ष, खजिनदार अशी रचना राहणार आहे. त्यामुळे शहर कार्यकारिणी जंबो राहणार आहे.

मुलाखतींनंतर निर्णय
जळगाव शहर कार्यकारिणीसंदर्भात संपर्कप्रमुखांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शहराध्यक्ष पदासाठी दीडशेपेक्षा अधिक तर शहर उपाध्यक्ष पदासाठी दोनशेहून अधिक अर्ज आले आहेत. संबंधितांच्या मुलाखती लवकरच सुरू करण्यात येतील. ललित कोल्हे, जिल्हाध्यक्ष, मनसे