आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MNS District Chairman And Other Three Gets One Year Custody

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसे जिल्हाध्यक्षासह तिघांना एक वर्षाची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दहा वर्षांपूर्वी एकावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांनी सोमवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्यासह आणखी दोन जणांना एक वर्ष कैद व दंडाची शिक्षा ठोठावली.


12 जून 2003 रोजी जिल्हा न्यायालयासमोर ललित कोल्हे यांच्यासह समाधान सुधाकर शेजवळ व विलास नंदू सोनवणे यांनी धनराज देविदास चौधरी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात धनराज गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी धनराज यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. अधिक तपास केला असता ललित कोल्हे यांनीच धनराजवर गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कोल्हेंसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांच्यासमोर सुरू असलेल्या या खटल्यात दहा साक्षीदार तपासण्यात आले.