आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेची मोर्चेबाजी; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा रुग्णालयातील विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी जिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला. शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. लाळीकर यांना निवेदन देत आठ दिवसांत समस्या न सोडविल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे, जमील देशपांडे, महानगराध्यक्ष वीरेश पाटील यांनी केले.

रुग्णालयातील सोयी सुविधांमध्ये सिटी स्कॅन मशीन वर्षभरापासून बंद आहे. प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांना जमिनीवरच झोपवले जाते. अपंगांना देण्यात येणार्‍या प्रमाणपत्रांसाठी पैशांची मागणी केली जाते. शस्त्रक्रिया करायची असल्यास रॉड बाहेरून ठरावीक दुकानातूनच खरेदी करण्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकार्‍यांनी केला. आंदोलनात दिलीप सुरवाडे, जितेंद्र करोसिया, श्याम दीक्षित, अजित शिंदे, भरतसिंग पाटील, रज्जाक सय्यद सहभागी झाले.