जळगाव - शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून सत्ताधार्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले. कोल्हे विद्यालय ते कालिकामाता मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये पाणी टाकून मासे सोडण्यात आले.
खड्डय़ांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कालिकामाता चौक परिसरात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात म्हशीच्या पाठीवर ‘ढिम्म प्रशासन, ढिम्म खाविआ’ रंगवण्यात आल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले. कार्यकर्त्यांच्या हातात खान्देश विकास आघाडी संचालित मत्स पालन केंद्र, महानगर पालिका संचालित मत्स पालन केंद्र लिहिलेले फलक होते. रस्त्यावर असलेल्या खड्डय़ांमध्ये पाणी टाकून मासे सोडण्यात आले होते.
आंदोलनात यांचा होता सहभाग
आंदोलनात महानगराध्यक्ष चंदन कोल्हे, नगरसेवक नितीन नन्नवरे, अनंत जोशी, माजी नगरसेवक लीलाधर सरोदे, अतुल वायकोळे, कुणाल कोल्हे, प्रवीण कोल्हे, महेश कोल्हे, हर्षल चिरमाडे, महेंद्र पाटील, निखिल खडके, रोहित खडके, महेश कोल्हे, संदीप गायकवाड, अलंकार जंजाळे, दीपक महाले, आकाश बनसोडे, सागर इंगळे, शरद सपकाळे, शेखर बनसोडे, वैशाली विसपुते आदी सहभागी झाले होते.